Akshaya Deodhar: अक्षया देवधरने व्हिडीओ शेअर करत मानले खास व्यक्तीचे आभार.. कोण आहे ही निधी?

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी आता लग्नानंतर काही खास व्हिडीओ शेयर करत आहेत.
Akshaya Deodhar shared special post for her manager nidhi mangale
Akshaya Deodhar shared special post for her manager nidhi mangale sakal
Updated on

Akshaya Deodhar and hardeek joshi: मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चा आहे ती अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या लग्नाची. त्यांचे लग्न होऊन आता एक आठवडा उलटून गेला तरी चर्चा काही थांबेना. हार्दिक आणि अक्षया दोघेही रोज काहीतरी आठवणी, फोटो, व्हिडिओ शेयर करत आहेत. आज अक्षयाने स्वतःचे फोटो न शेयर करता एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये तिने अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने एका व्यक्तीचे आभार मानले आहेत, जिचा या लग्नामध्ये मोठा मदतीचा हात होता. तर जाणून घेऊया ती व्यक्ती नेमकी कोण आहे..

(Akshaya Deodhar shared special post for her manager nidhi mangale )

Akshaya Deodhar shared special post for her manager nidhi mangale
Anurag Kashyap: खुळ्यांनो.. अनुराग कश्यप सैराट बद्दल चांगलंच बोलला.. खरं काय ते ऐका..

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी कधी लग्न करणार याची उत्सुकता साऱ्यांना होती. अखेर ते 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. पुण्यामध्ये आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत अत्यंत पारंपरिक रित्या ही लग्न पार पडले. लग्नाची हळद, मेहंदी, रिसेप्शन हा सगळाच एक मोठा सोहळा होता. यामध्ये अनेकांचे हात होते, कारण इतकं भव्यदिव्य काही करण्यासाठी प्रचंड मेहनत लागली होती. त्यामुळे हार्दिक आणि अक्षयाने एक पोस्ट करून सर्वांचे आभार मानले. पण आज एक खास व्हिडिओ एका खास व्यक्तीसाठी अक्षयाने पोस्ट केला आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

ती व्यक्ती आहे. निधी मांगले. निधी ही गेली काही वर्षे अक्षयाची मॅनेजर आहे. अक्षया-हार्दिकच्या लग्नात तिचा मोठा सहभाग आहे. अगदी लग्नातल्या बारीक सारिक गोष्टींपासून नियोजन- आयोजन सर्व काही ती पाहत होती. त्यामुळे अक्षयाने एक व्हिडिओ शेयर करून तिचे आभार आणि कौतुकही केले आहे.

या पोस्ट मध्ये अक्षया म्हणाली की, 'जी व्यक्ती माझ्यासोबत माझ्या लग्नाची गेले बरेच महीने तयारी करत होती, ज्या व्यक्तीमुळे काम व लग्न व्यवस्थित झालं, जीच्यामुळे कोलॅबरेशन, फोटोशूट, कोऑरडिनेशन, एकूणच सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं आणि हवे असलेले सर्व क्षण मला आनंदाने, कोणतीही चिंता न करता, एन्जॉय करता आले, ती व्यक्ती म्हणजे निधी मांगले. मिडियाला फोटो- व्हिडिओ देण्यापासुन ते मला व हार्दीकला कुठे काय करायचं आहे, हे सर्वच प्लान तिने केलं. तिने सर्व खुप मनापासुन केलं. आमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. जसं मी म्हटलं, तुझ्याशिवाय आमचं लग्न होणं अशक्य होतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com