esakal | आलिया, रणबीरची सफारी सैर व्हायरल, रणथंबोर स्पेशल 
sakal

बोलून बातमी शोधा

Alia and Ranbir

सेलिब्रिटी ज्याठिकाणी फिरायला जातात त्याठिकाणचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे त्यांना फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. बॉलिवूडमधल्या एक प्रसिध्द कपल असणाऱ्या रणबीर आणि आलियाची सैर व्हायरल झाली आहे. त्याचे जे काही फोटो सोशल मीडियावर आहेत त्याला चाहत्यांनी गमतीदार कमेंटही दिल्या आहेत. 

आलिया, रणबीरची सफारी सैर व्हायरल, रणथंबोर स्पेशल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - सेलिब्रिटी ज्याठिकाणी फिरायला जातात त्याठिकाणचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे त्यांना फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. बॉलिवूडमधल्या एक प्रसिध्द कपल असणाऱ्या रणबीर आणि आलियाची सैर व्हायरल झाली आहे. त्याचे जे काही फोटो सोशल मीडियावर आहेत त्याला चाहत्यांनी गमतीदार कमेंटही दिल्या आहेत. 

आलिया आणि रणबीरचे रणथंबोर जंगलात फिरण्यासाठी गेले आहेत. त्यांनी त्याचे फ़ोटो व्हायरल केले आहेत. या दोघांनी व्हॅकेशन ट्रीप एन्जॉय केली आहे. त्या दोघांनी केलेली धमाल त्यांच्या फोटोतून दिसून आली आहे. विशेष म्हणजे ते दोघेही आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत फिरायला गेले आहेत. सध्या ते दोघेही राजस्थानात सुट्टी आनंदात घालवत आहेत. नुकतेच अलियाने नीतू कपूर आणि सोनी राजदान यांच्या बरोबरचे फोटो शेयर केले आहेत. त्या फोटो मध्ये ते सर्वजण शेकोटीचा आनंद घेताना दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अलियाने वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोला चाहत्यांनी मोठ्या संख्येने लाईक आणि कमेंट केल्या आहेत. अलिया आणि रणबीर यांच्या बरोबर त्यांच्या परिवारातील रिद्धीमा कपूर, भरत, समायरा हे ही सहभागी झाले आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंब ही सैर एन्जॉय करताना दिसत आहे. आलियाबरोबरच नीतू कपूर, सोनी राजदान, यांनीही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलियाने इंस्टावर जे फोटो शेयर केले आहेत त्यात ती एका अनोख्या लूकमध्ये दिसून आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अलियाने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस, विंटर ट्रेंचकोट, आणि टोपी असा लूक केला आहे त्याबरोबर लॉंग हाय शूजही घातले आहेत. तिने जे फोटो शेयर केले आहेत त्यावर कॅप्शनही लिहिली आहे. ती म्हणते, आता आमच्यासोबत आणि आमच्यासमोर आहे त्यासगळ्यासाठी चिअर्स. त्या फोटोमध्ये रणबीरचीही झलक पाहायला मिळत आहे.

Edited By - Prashant Patil