IIFA Awards 2019 : आयफा पुरस्कारावर उमटवली या कलाकारांनी मोहोर!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग यांना सर्वोकृष्ट अभिनेता व अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले, तर 'राझी' चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. 

मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग यांना सर्वोकृष्ट अभिनेता व अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले, तर 'राझी' चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. 

'मेड इन चायना'चा ट्रेलर रिलीज; राजकुमार राव करणार 'इंडिया का जुगाड'

अनेक कलाकारांना यंदा आयफा अॅवॉर्ड्सने गौरविण्यात आले. आलियाला राझीसाठी, तर रणवीरला पद्मावत मधील सर्वोत्तम अभिनयामुळे सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्रीराम राघवन यांना अंधाधूनसाठी अॅवॉर्ड मिळाला. तर ज्येष्ठ अभिनेते जगदीप जाफरी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदाचा हा 20वा आयफा अॅवॉर्ड सोहळा होता. 

 

 

या कलाकारांना मिळाले आयफा अॅवॉर्ड्स : 

सर्वोत्कृष्ट चित्रपट : राझी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट - राझी

सर्वोत्कष्ट अभिनेता : रणवीर सिंग - पद्मावत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : श्रीराम राघवन - अंधाधुन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अदिती राव हैदरी - पद्मावत

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : विकी कौशल - संजू

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : सारा अली खान - केदारनाथ

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : इशान खट्टर - धडक

आयफा 20व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : दीपिका पदुकोण

आयफ 20व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर

20 वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत : प्रितम

20 वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार हिरानी - संजू

सर्वोत्कृष्ट संगीत : 'सोनू के टिटू की स्वीटी'

सर्वोत्कृष्ट कथा : 'अंधाधुन'

जीवनगौरव पुरस्कार : ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी

सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य - धडक

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंग - ए वतन - राझी

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : हर्षदीप कौर - दीलबरो - राझी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alia Bhatt and Ranveer Singh won best Actor Actress award at IIFA Awards 2019