Alia Bhatt : 'ब्रा लपवणे अन्...'! ट्रोल करणाऱ्यांवर आलियाचा संताप|Alia Bhatt Bollywood actress fired women being asked to hide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt  news

Alia Bhatt : 'ब्रा लपवणे अन्...'! ट्रोल करणाऱ्यांवर आलियाचा संताप

Alia Bhatt News: आलियाचं रणबीर सोबत लग्न झालं, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी तिनं गोड बातमी दिली. झालं नेटकऱ्यांना आलियाला ट्रोल करण्याची संधी मिळाली. त्यांनी तिच्यावर सडेतोड टीका करण्यास सुरुवात केली. आलिया (alia bhatt social media trolled) सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील सगळ्यात ट्रेंडिंग असणाऱ्या या अभिनेत्रीवर नेटकरी वाट्टेल त्या शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना दिसत (trending news) आहे. मात्र त्या सगळ्यावर आलियानं दिलेली प्रतिक्रिया देखील जशास तशी आहे. आलियानं नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. यापूर्वी देखील आलियानं दरवेळी पुरुषांपेक्षा बाईला कशाप्रकारे टीकेचा सामना करावा लागतो याविषयी सांगितले होते.

आलियाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ब्रम्हास्त्र 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित (social media news) होणार आहे. त्याची गेल्या तीन वर्षांपासून चर्चा आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यासगळ्यात आलिया वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेतही आली आहे. आलिया जशी तिच्या प्रेग्नंसीसाठी चर्चेत आहे तशी ती तिच्या डार्लिंग नावाच्या चित्रपटामुळे देखील ट्रेंड होताना दिसत आहे. त्या चित्रपटाची निर्मिती आलियानं केली आहे. आलियानं यावेळी आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, आज बॉलीवूडमध्ये कोणत्याही कारणास्तव कुणावरही सेक्सिस्ट कमेंट करणे सोपे झाले आहे. त्याचे कुणाला काही वाटेनासे झाले आहे. मात्र ज्यावेळी आपण अशाप्रकारची टीका कुणावर करतो तेव्हा त्याला काय वाटते याचा साधा विचारही करत नाही. त्या व्यक्तीसाठी ही टीका वेदनादायी असते. आज लोकं ब्रा....लपवणे, याशिवाय इतर अंतर्वस्त्रं जागेवर न ठेवण्यासारख्या गोष्टी जाहीरपणे सोशल मीडियावर शेयर करत आहेत. मला हेच कळत नाही तुम्हाला तुमचे कपडे का लपवायचे आहेत.... आता मी यापैकी काहीच करत नाही. तरी देखील मला ट्रोल का केले जाते. असा सवाल आलियानं केला आहे.

हेही वाचा: Ranbir Kapoor: 'हार्ली डेव्हिडसन' मला मिळाली, ओरडा संजुनं खाल्ला!

मला राग यासाठी येतो की, दरवेळी महिलांनाच त्यांची अंतर्वस्त्रं लपवण्यास सांगितले जाते. पुरुषांना हे सांगितले जात नाही. त्यामागील कारण काय हे कळायला मार्ग नाही. तुम्ही मला दरवेळी सांगता की, एवढं सीरियस होऊ नको म्हणून आपण काय करतो आहोत याचा विसर लोकांना पडतो. हे त्यांच्या लक्षात येत नाही. अशा शब्दांत आलियानं तिचा राग व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Alia Bhatt: 'लोकं मला मुर्ख समजतात ही चांगलीच गोष्ट!' काय झालं आलियाला?

Web Title: Alia Bhatt Bollywood Actress Fired Women Being Asked To Hide The Bra Not Men Under Garments

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..