Alia Bhatt: 'लोकं मला मुर्ख समजतात ही चांगलीच गोष्ट!' काय झालं आलियाला? |Alia Bhatt pronounces president Droupadi Murmu as India President | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt news

Alia Bhatt: 'लोकं मला मुर्ख समजतात ही चांगलीच गोष्ट!' काय झालं आलियाला?

Alia Bhatt news: रणबीरची पत्नी, प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरणाऱ्या आलियाच्या आगामी प्रोजेक्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रमध्ये आलिया आणि रणबीर मुख्य भूमिकेत (Bollywood Actress news) असणार आहे. त्याच्या ट्रेलरला मोठा प्रतिसादही मिळाला होता. आलियानं सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याचा सपाटा सुरु केला आहे. 2013 मध्ये आलियानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं कऱण (Social media news) जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये आलियानं प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. करण जोहरच्या शो मध्ये आल्यानंतर आलियानं एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचे काय आहे की, आलिया एका मुलाखतीमध्ये प्रणब मुखर्जी नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले होते. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली होती. त्यानंतर आलियाला आपली चूक कळल्यावर तिनं (entertainment news) माफीही मागितली होती. मात्र तरीही आलियावर टीका होतच होती. यासगळ्या परिस्थितीवर आलियानं सडकून टीका केली. यावेळी देखील देशाच्या राष्ट्रपतींचे नाव कोण असे विचारले तेव्हा मात्र तिनं बरोबर नाव घेतले. यावरुन त्यावेळच्या प्रसंगाची आठवण नेटकऱ्यांनी करुन दिली आहे.

आलियानं आपल्यावर टीका करणाऱ्यांना सडकून उत्तर दिलं आहे. लोकांना काय फक्त सेलिब्रेटी कधी चुकतात याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी त्यांच्या टीकेकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे, आपण काहीही केलं तरी ते त्यांना आवडत नाही. त्यांना आवडते म्हणून आपण एखादी गोष्ट करत राहिलो तर आपल्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे यासर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करावा लागतो. असे आलियानं म्हटले आहे.

हेही वाचा: Video: 'आय हेट यू डॅडी'

आलियानं यावेळी आपल्याकडून पुन्हा चूक होणार याची काळजी घेतली आहे. लोकांना वाटतं मी मुर्ख आहे तर मी आहे. आणि त्यांना तसे वाटते यात मलाही आनंद आहे. अशा प्रकारे ते मला फॉलो करतात. माझे चित्रपट पाहतात. आणखी काय हवं. मला एका गोष्टीचा फार आनंद होतो जेव्हा लोकं मला मुर्ख समजतात. ते माझ्यावरुन मीम्स तयार करतात. त्यामुळे मी आणखी लोकप्रिय होते. असे आलियानं म्हटलं आहे.

हेही वाचा: Ranveer Singh: 'टेन्शन नही लेनेका और...' टाटा सन्सच्या एन. चंद्रशेखर यांचा भन्नाट सल्ला

Web Title: Alia Bhatt Pronounces President Droupadi Murmu As India President People Think I M Dumb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top