Arjun Kapoor : आलियाची तुलना मेरिल स्ट्रीपशी कशी करता? अर्जूनच्या तुलनेवर नेटकऱ्यांची आगपाखड

अर्जूननं त्याच्या इंस्टाच्या स्टोरी सेक्शनमध्ये लिहिले होते की, करण जोहरचे चित्रपट हे नेहमीच खूप मनोरंजन करुन जातात.
 Alia Bhatt compare with Meryl Streep Arjun Kapoor
Alia Bhatt compare with Meryl Streep Arjun Kapoor esakal

Arjun Kapoor Trolled For Comparing Alia Bhatt Legend Meryl Streep : आलिया आणि रणवीर सिंगच्या रॉकी और रानी नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी आलियाचे कौतूकही केले आहे. यासगळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जून कपूरनं आलियाची तुलना हॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री, ऑस्कर विजेत्या मेरिल स्ट्रीप यांच्याशी केली आहे. त्यामुळे अर्जून ट्रोल होतो आहे.

अर्जूननं त्याच्या इंस्टाच्या स्टोरी सेक्शनमध्ये लिहिले होते की, करण जोहरचे चित्रपट हे नेहमीच खूप मनोरंजन करुन जातात. ते चित्रपट पाहण्याची उत्सुकताही असते. आलियाचा आता नवीन चित्रपट येतो आहे. छोट्या मेरिल स्ट्रीपला खूप शुभेच्छा. तिनं नेहमीप्रमाणे खूपच प्रभावी काम केले आहे. अशा शब्दांत अर्जूननं आलियाविषयी लिहिले आहे. मात्र त्यावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

तुम्ही मेरिल स्ट्रीपचे नाव खराब करु नका. त्या खूपच उच्च दर्जाच्या अभिनेत्री आहेत. आलियाची लगेच त्यांच्याशी तुलना करणे हे खूपच घाईचे होईल. अजून आलियाकडे खूप वेळ आहे. संधी आहे त्यानंतर तिची तुलना करायची किंवा नाही हे ठरवता येईल. अशा प्रतिक्रिया अर्जूनला त्या पोस्टवर येत आहेत. दुसरीकडे काहींनी मेरिलला जर ही गोष्ट कळली तर ती चक्कर येऊन पडेल. अशा गमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आलियावर नेटकऱ्यांचा भडका..

अर्जूनच्या त्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अनेकांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे. एकानं म्हटले आहे की, तुला मेरिल स्ट्रीप आणि आलियाची तुलना करताना काहीच कसे वाटले नाही, दुसऱ्या एका युझर्सनं लिहिलं आहे की, कमीत कमी देवाला तरी घाबरा रे, तुम्ही काय बोलता आहात. जर अर्जून आणि आलिया कमेंट्स वाचत असतील तर त्यांनी काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अर्जूनचे कान टोचले आहेत.

मेरिल स्ट्रीप कोण आहे?

हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या मेरिल स्ट्रीपच्या अभिनयाचा जगभर मोठा दरारा आहे. सोशल मीडियावर देखील त्या नेहमीच चर्चेत असतात. चारपेक्षा अधिकवेळा त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्करचं नामांकन मिळालं आहे. त्यांना आर्यन लेडी आणि सोफीच चॉईससाठी ऑस्करही मिळालं आहे. अशा अभिनेत्रीसोबत आलियाच्या नावाची तुलना झाल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com