Alia-Ranbir: कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही! आलिया-रणबीरचा फतवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt-Ranbir Kapoor WON’T ALLOW Friends To Meet Their Newborn Without A Negative COVID-19 Test

Alia-Ranbir: कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही! आलिया-रणबीरचा फतवा

alia bhatt and ranbir kapoor: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. सध्या चर्चा आहे आलिया आणि रणबीर यांच्या लाडक्या बाळाची. ते दोघेही नुकतेच ते आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. आलिया भट्ट आणि रणवीर कपूर हे दोघे आपल्या मुलीची खुप काळजी घेताना दिसत आहे. आता मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी नवा फतवा जाहीर केला आहे.

(Alia Bhatt-Ranbir Kapoor WON’T ALLOW Friends To Meet Their Newborn Without A Negative COVID-19 Test)

हेही वाचा: Aastad Kale: चर्चा तर होणारच! आस्ताद काळे आणि आदिती सारंगधर एकत्र..

आलिया भट्टने रविवारी एका गोड मुलीला जन्म दिला. आलिया आणि बाळ दोघेपण मस्त आहेत. गुरूवारी आलिया आणि रणबीर बाळाला घेऊन घरी आली. रणबीरने अगदी नाजूक हातांनी आपल्या लेकीला पकडले होते. जेव्हा आलिया हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला भेट दिली होती. पण आता या छोट्या बाळाला भेटण्यासाठी कठोर नियम केले आहेत.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4:जितूच्या सरप्राइजने स्पर्धकांना अश्रु अनावर.. काय केलं असं?

सध्या कोरोनाचे नियम कडक नसले तरी अजुन कोरोना गेलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आपले बाळ निरोगी वातावरणात वाढावे असे विचार पालक करतात. असाच विचार आता आलिया आणि रणवीर करत आहेत. ते आपल्या बाळाला कोणालाही भेटू देणार नाहीत. बाळाला भेटायचे असेल तर 'COVID-19' कोविडची चाचणी करणे बंधनकारक आहे. टी निगेटिव्ह आल्यावरच भेट शक्य होणार आहे. कारण नवजात बालकांना रोग आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच बाळाचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून पाहुण्यांना बाळाच्या आजूबाजूला त्यांचा फोन वापरण्याचीही परवानगी दिली जाणार नाही.