Alia Bhatt: 'तर मग माझे सिनेमे पाहू नका...' ट्रोलर्सवर केलेला पलटवार भोवणार'?

आलिया भट्टने एका प्रमोशनल कार्यक्रमात ट्रोलर्सवर पलटवार करताना केलेलं विधान तिच्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या यशाच्या आड येईल अशी चर्चा रंगली आहे.
Alia Bhatt Latest News
Alia Bhatt Latest NewsAlia Bhatt Latest News

Alia Bhatt Latest News आलिया भट्टच्या (Alia Bhatt) कारकिर्दीची सध्या जोरदार यशोगाथा लिहिली जात आहे. बॉक्स ऑफिसवर संघर्ष करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये २०२२ मध्ये तिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. त्याचवेळी ओटीटीवर आलेला ‘डार्लिंग्स’लाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आलियाच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. आता आलिया एका मुद्द्यावर खुलेपणाने बोलली आहे.

आलिया लवकरच पती रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया-रणबीरची (Ranbir Kapoor) जोडी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आलिया एका मुद्द्यावर खुलेपणाने बोलली आहे. तिला बऱ्याच काळापासून याचा त्रास झाला होता. २०१२ मध्ये करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणारी आलिया कदाचित सर्व स्टार किड्समध्ये सर्वाधिक ट्रोल झाली असेल.

Alia Bhatt Latest News
Swara Bhasker : स्वरानं सांगितलं बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण....

ट्रोलिंगबद्दल बोलताना आलिया भट्ट (Alia Bhatt) म्हणाली, तिला असे वाटते की ती चित्रपटांमधून अशा गोष्टींना उत्तम उत्तर देऊ शकते. म्हणूनच तिने ट्रोलिंगला प्रतिसाद दिला नाही. स्वतःला वाईट वाटण्यापासून थांबवले. मला नक्कीच वाईट वाटले. परंतु, ज्या कामासाठी तुम्हाला प्रेम आणि आदर मिळतो त्या कामासाठी वाईट वाटणे ही एक छोटीशी किंमत आहे. मी गंगुबाई काठियावाडीसारखा चित्रपट दिला. मग शेवटी हसण्याची संधी कोणाला मिळाली? जोपर्यंत मी फ्लॉप चित्रपट देत नाही तोपर्यंत हसत राहील.

पसंद नसेल तर पाहू नका

मी शब्दात उत्तर देऊ शकत नाही. मी आवडत नसेल तर माझ्याकडे पाहू नका. मी काहीही करू शकत नाही. लोकं काही ना काही बोलत राहतात. आलियाने आशा व्यक्त केली की चित्रपटांद्वारे ती लोकांना हे सिद्ध करेल की तिच्याकडे असलेल्या स्थानासाठी ती पूर्णपणे पात्र आहे, अशी आलिया म्हणाली.

आलियाच्या वक्तव्याचा काय परिणा होतो?

करीना कपूरच्या (Karina Kapur) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या वेळी जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती ‘आमचे चित्रपट पाहू नका, कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही’ असे ट्रोल्सना उत्तर देत होती. लाल सिंग चड्ढाच्या प्रदर्शनावेळी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या युजर्सनी करीनाचे हे विधान पकडले आणि चित्रपटाच्या निषेधार्थ हा मुद्दाही जोडला गेला. आता आलियाच्या वक्तव्याचा काय परिणा होतो, हेच पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com