Alia Bhatt: प्रत्येकवेळी बाईवरच 'डोळा'? आलियानं नेटकऱ्यांना पुन्हा झापलं|Alia Bhatt reaction trollers Nonsensical | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia bhatt news

Alia Bhatt: प्रत्येकवेळी बाईवरच 'डोळा'? आलियानं नेटकऱ्यांना पुन्हा झापलं

Alia Bhatt news: आलिया सतत चर्चेत आहे. जशी तिनं आपल्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियावरुन सांगितली तेव्हापासून आलियाच्या नावावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वादही सुरु झाले आहेत. आलियाचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं. त्यानंतर आलियानं प्रेग्नंसीची बातमी शेयर केल्यानं तिच्यावर जोरदार टीकाही झाली. (Bollywood Actor Ranbir Kapoor News) आलिया लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती का, मग तिनं हे तेव्हाच का नाही सांगितलं, अशाप्रकारचे प्रश्न नेटकऱ्यांनी आलियाला विचारले आहे. आलियानं नेटकऱ्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. ज्यांनी आलियाला ट्रोल केले आहे. त्यावर आलियानं दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

आलिया म्हणते दरवेळी नेटकऱ्यांचे काही ना काही म्हणणे असते. त्यांना सेलिब्रेटींच्या आयुष्यात काय चालले आहे याविषयी कमालीची उत्सुकताही असते. (Bollywood movie) तुम्ही ज्यावेळी इतरांच्या आयुष्यात नको तेवढं डोकावता तेव्हा तुम्ही चुकीचे वागता असे नाही का वाटत, ज्या लोकांनी मी गरोदर आहे म्हणून टीका सुरु केली त्यांना काय बोलावे हेच कळत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आणि रणबीरवर मोठी टीका झाली आहे. आम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही का, लोकं काय म्हणतात याचा विचार करुन आम्ही निर्णय घ्यायचे का असा प्रश्न आलियान यावेळी उपस्थित केला आहे.

एखाद्या महिलेला कोणत्याही कारणावरुन ट्रोल केले जाते. ती कुणाबरोबर फिरते, कुणाबरोबर क्रिकेटची मॅच पाहायला गेली, काहीही असलं तरी बातमीच्या हेडिंगमध्ये महिला असतेच. त्याशिवाय बातमी पूर्णच होत नाही. सगळा मुर्खपणा आहे. मुर्खासारखे नेटकरी मला ट्रोल करत राहतात. अर्थातच मी अजुनही तरुण आहे. म्हातारी झालेली नाही. माझ्या आरोग्याची काळजी नेटकऱ्यांना असते. त्यापेक्षा मी कशी प्रेग्नंट होते आहे याचे त्यांना नवल वाटायला लागते.

हेही वाचा: Viral Video: 'हर-हर शंभू!' गाणारी शाळकरी मुलगी 'अभिलिप्सा पंड्डा' आहे कोण?

आलियानं पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, एखादी बाई जेव्हा आई होण्याचा निर्णय घेते तेव्हा तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा जातात. प्रत्येकवेळी महिलेवर नजर ही असते. त्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चाही केले जाते. आलिया सध्या लंडनमध्ये एका हॉलीवूडपटामध्ये काम करते आहे. त्या चित्रपटाचे नाव हार्ट ऑफ स्टोन्स असे आहे.

हेही वाचा: Tiger-Disha Breakup: टायगर - दिशाचं 'ब्रेक अप' सहा वर्षाचं प्रेमं आटलं!

Web Title: Alia Bhatt Reaction Trollers Nonsensical Mocked Her Pregnancy Viral Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top