esakal | कोरोना रुग्णांसाठी आलियाने पुढे केला मदतीचा हात

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

कोरोना रुग्णांसाठी आलियाने पुढे केला मदतीचा हात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना रूग्णांची Covid 19 संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रूग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधांची कमतरता भासत आहे. अनेक सामाजिक संस्था यासाठी काम करत आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Alia Bhatt या सामाजिक संस्थेची frontline NGOs माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. आलियाने सोशल मीडियावर एकूण चार संस्थांची नावं, कोणत्या सेवेसाठी कार्यरत आहेत ते क्षेत्र, संपर्क क्रमांक आणि पत्ता या सर्व माहितीची यादी शेअर केली आहे. (alia bhatt shares list of ngos provided donations on social media)

हेमकुंट फाउंडेशन, हसिरू डाला फाऊंडेशन, रूरल हेल्थकेअर फाऊंडेशन आणि नोतून जीबोन अशी या चार सामाजिक संस्थांची नावं आहेत. या संस्था कोरोना काळात ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि अन्न या सर्व गोष्टी गरजूंसाठी उपलब्ध करून देत आहेत. क्वारंटाइन रुग्णांसाठी भोजन आणि करोना व्हायरसशी झुंजणाऱ्या रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्याचं कामदेखील या संस्था करत आहेत. सोशल मीडियावर आलियाला अनेक लोक फॉलो करतात. त्यामुळे या संस्थेची माहिती आणि कार्य सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा : जान्हवीचं 'मालदिव व्हेकेशन'बाबत स्पष्टीकरण; पोस्ट केला नवीन फोटो

अनेक वेळा कोरोना रूग्णांना मदत न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे या संस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे हे अत्यंत गरजेचे होते. आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या माहितीचे सर्वजण कौतुक करत आहेत. या माहितीमुळे अनेक रूग्णांना मदत होऊ शकते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना रूग्णांसाठी मदत करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अजय देवगण, कलाकारांनी कोरोना रूग्णांसाठी मदत केली आहे.