esakal | जान्हवीचं 'मालदिव व्हेकेशन'बाबत स्पष्टीकरण; पोस्ट केला नवीन फोटो

बोलून बातमी शोधा

Janhavi Kapoor
जान्हवीचं 'मालदिव व्हेकेशन'बाबत स्पष्टीकरण; पोस्ट केला नवीन फोटो
sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशावर कोरोनाचं संकट असताना सेलिब्रिटी त्यांच्या 'मालदिव व्हेकेशन'चे Maldives फोटो सोशल मीडियावर कसे पोस्ट करू शकतात, असा सवाल अनेकांकडून विचारला गेला. रणबीर कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान, दिशा पटानी, टायगर श्रॉफ असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गेल्या काही दिवसांत मालदिवला फिरायला गेले. तिथल्या व्हेकेशने फोटोसुद्धा काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र यामुळे सेलिब्रिटींवर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. आता या टीकांवर अभिनेत्री जान्हवी कपूरने Janhvi Kapoor स्पष्टीकरण दिलं आहे. इन्स्टाग्रामवर एका मासिकाच्या कव्हर पेजचा फोटो पोस्ट करत जान्हवीने मालदिवला जाण्यामागचं कारण नेटकऱ्यांना सांगितलं आहे. (Janhvi Kapoor gives clarification about her Maldives vacation pic)

'या पोस्टबद्दल आधीच ठरलं होतं आणि लॉकडाउन होण्याआधीच फोटोशूट केलं गेलंय. आम्ही सुरक्षित आहोत आणि सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. प्रत्येकजण सुरक्षित आहे, अशी आशा करते', असं तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. जान्हवीने एका ट्रॅव्हलशी संबंधित मासिकासाठी कव्हर फोटोशूट केलं आहे. त्याच फोटोशूटसाठी ती मालदिवला गेली होती, असं तिचं म्हणणं आहे.

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'मालदीव व्हेकेशन'वरून मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर टीका आणि मीम्ससुद्धा व्हायरल

'इथे लोकांना जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा', अशी टीका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने केली होती. 'तुमच्यासाठी हे व्हेकेशन असेल, पण संपूर्ण जगात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे असंवेदनशील मूर्ख बनून सोशल मीडियावर तुमच्या सुखी आयुष्याचे फोटो पोस्ट करू नका', अशा शब्दांत लेखिका शोभा डे यांनी फटकारलं होतं. मालदिव व्हेकेशनमुळे टीकेच्या निशाण्यावर असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोदी मीम्ससुद्धा व्हायरल झाले.