आलिया भट्ट-संजय दत्त स्टारर 'हा' सिनेमा होणार ऑनलाईन रिलीज

टीम ई सकाळ
Monday, 29 June 2020

एकानंतर एक असे मोठे सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. त्यातंच आता आणखी एका सिनेमाची भर पडलीये.

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे मनोरंजन विश्वाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शक मोठ्या पडद्यावर सिनेमे रिलीज करण्यासाठी तयार नाही आहेत. एकानंतर एक असे मोठे सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. त्यातंच आता आणखी एका सिनेमाची भर पडलीये. लवकरंच आलिया भट्ट स्टारर 'सडक २' हा सिनेमा देखील ऑनलाईन रिलीज होणार आहे.

हे ही वाचा: अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांची भेट

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा बहुप्रतिक्षित आणि चर्चित 'सडक २' हा सिनेमा आता डिजीटलवर रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाचे निर्माते मुकेश भट्ट यांनी नुकतंच हे स्पष्ट केलं आहे. विशेष फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओद्वारे निर्मित 'सडक २' या सिनेमात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

हा सिनेमा आधी १० जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे थिएटर अजुनही बंद अवस्थेत आहेत आणि अजुनतरी ते सुरु होण्याची खूप वाट पाहावी लागणार असंच दिसतंय. त्यामुळे ही परिस्थिती पाहता सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुकेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोविड-१९ संसर्गाची संख्या कमी व्हायची सोडून वाढतंच चालली आहे. या परिस्थितीत तुम्हाला वाटतं का की थिएटर सुरु होतील ? आणि जरी सुरु झाले तरी लोकं सिनेमे पाहायला थिएटरमध्ये येतील? लोकांना त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. सध्या लोकांना जीव महत्वाचा आहे. मी हा सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्यासाठी मजबुर आहे कारण मला भविष्यात कोणतीच आशा दिसत नाहीये. तुम्हाला काही गोष्टी मनात नसल्या तरी करणं भाग असतं. आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये.'

'सडक २' हा सिनेमा १९९१ मधील पूजा भट्ट आणि संजय दत्त स्टारर 'सडक' या सिनेमाचा सिक्वेल आहे.   

alia bhatt starer sadak 2 will get online release confirms mahesh bhatt  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alia bhatt starer sadak 2 will get online release confirms mahesh bhatt