Alia Bhatt Pregnancy: मुंबईत 'या' हॉस्पिटलमध्ये आलिया देणार बाळाला जन्म... Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt WIll Deliver Her baby in 'This' Hospital in Mumbai, due month to every details.

Alia Bhatt Pregnancy: मुंबईत 'या' हॉस्पिटलमध्ये आलिया देणार बाळाला जन्म...

Alia Bhatt Pregnancy: ४ एप्रिल २०२२ ला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अगदी मोजक्याच कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत बान्द्रे येथील आपल्या घरी लग्नगाठ बांधली. आणि आता ते आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत करण्यासही सज्ज आहेत.

काही दिवसांपूर्वीच आलियाचं डोहाळे जेवण अगदी छोटेखानी पद्धतीनं पार दिमाखात पार पडलं. या सोहोळ्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले पहायला मिळाले. आता लवकरच आलियाची डिलिव्हरी देखील होईल. पण कोणत्या महिन्यात आणि कुठल्या हॉस्पिटमध्ये आलिया बाळाला जन्म देणार आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया.(Alia Bhatt WIll Deliver Her baby in 'This' Hospital in Mumbai, due month to every details.)

हेही वाचा: Vaishali Takkar Suicide: कोण आहे राहूल नवलानी, ज्याच्या धमक्यांनी वैशालीचं जगणं अशक्य केलं होतं...

एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की, आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देईल. आलियाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे त्यानुसार आलियाचे नाव डिलिव्हरीसाठी एका हॉस्पिटलमध्ये रजिस्टर करण्यात आले आहे.

आलिया 'एच.एन,रिलायन्स फाऊंडेशन' या हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाला ज्नम देणार आहे. हे हॉस्पिटल मुंबईत गोरेगावमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट आपल्या कामातून एक मोठा ब्रेक घेणार आहे. जवळपास १ वर्षाचा काळ ती आपल्या बाळासोबतच घालवणार आहे.

आलिया भट्टने लग्नाच्या २ महिन्यानंतर २७ जून २०२२ रोजी आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती, आणि सगळ्यांना हैराण केलं होतं. आपल्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलच्या बेडवर सोनोग्राफी करताना झोपलेली असतानाचा फोटो आलियानं शेअर केला अन् आपल्या सगळ्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता.

प्रेग्नेंसीनंतरही आलिया ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी अनेकवेळा फिरताना दिसली. सिनेमाला समिक्षकांनी संमिश्र रिव्ह्यू दिले तर चाहत्यांना इम्प्रेस करण्यात ब्रह्मास्त्र यशस्वी ठरला. याव्यतिरिक्त बाळाच्या जन्माआधी आलिया भट्टनं आपले जूने प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत.