Alia-Ranbir चा बान्द्रे इथला 8 मजली बंगला बनून तयार, सगळ्यात खास असणार ऋषी कपूर यांची खोली RIshi Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia-Ranbir Bungalow krishnaraj 8 storey building ready

Alia-Ranbir चा बान्द्रे इथला 8 मजली बंगला बनून तयार, सगळ्यात खास असणार ऋषी कपूर यांची खोली

Alia-Ranbir Bungalow: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता आई-बाबा बनले हे जगजाहीर झालंय,त्यांनी एका क्यूट बेबी गर्लला जन्म दिला आहे. कपूर कुटुंबात सध्या सगळीकडे आनंदी-आनंद पसरला आहे. यादरम्यान आता रणबीर-आलियानं चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा कृष्णा-राज बंगला बनून तयार झाला आहे. बान्दे येथील पाली हिल मध्ये असलेल्या या बंगल्याचं गेल्या ३ वर्षांपासून काम सुरू होतं. स्वतः आलिय,रणबीर नीतू कपूर बंगल्याचं काम सुरू असताना अनेकदा काम पहायला भेट देताना दिसले . बोललं जात आहे की रणबीर-आलिया आपल्या छोट्या राजकुमारीला घेऊन लवकरच बंगल्यात गृहप्रवेश करणार आहेत.(Alia-Ranbir Bungalow krishnaraj 8 storey building ready)

हेही वाचा: Big Boss 16: अर्ध्या रात्री बिग बॉसच्या घरातून हाकललं अर्चना गौतमला, चर्चेला उधाण...

नीतू कपूर,रणबीर कपूर,आलिया भट्ट आणि कपूरांची नवी प्रिन्सेस ८ मजल्याच्या बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. बंगल्यात कोण कुठे राहणार याविषयी बोलायचं झालं तर यातील एक मजला नीतू कपूर यांचा असणार आहे,जिथे त्या एकट्या राहणार आहेत. दुसरा मजला रणबीर,आलिया आणि त्यांच्या लहान प्रिन्सेसचा असणार आहे.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: कोण आहे बिग बॉस मराठीच्या घरातील 'देवदास'? तेजस्विनीनं केलं जाहीर...

बंगल्यातील एक मजला स्पेशल बेबी गर्ल साठी सजवण्यात येणार आहे. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिची अशी स्पेशल स्पेस त्या मजल्यावर आधीच रेडी करून ठेवण्यात आली आहे. बंगल्यातील चौथा मजला हा रणबीरची बहीण रिद्धिमा आणि तिची मुलगी समारा साठी ठेवण्यात आला आहे. जेव्हा त्या मुंबईत येतील तेव्हा त्या तिथे राहतील.

हेही वाचा: Kantara: 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीनं तर बॉलीवूडची इज्जतच काढली; म्हणाला...

अन्य मजल्यांवर अद्याप काम सुरू आहे. एका मजल्यावर स्विमिंग पूल असणार आहे. एका मजल्यावर नीतू कपूर,आलिया भट्ट,रणबीर कपूर यांची ऑफिसेस असणार आहेत. इथे बसून सिनेमाच्या स्क्रीप्ट्सचं वाचन केलं जाईल. याच मजल्यावर एक खोली ऋषी कपूर यांना समर्पित करण्यात आली आहे. इथेच तीन्ही जनरेशन बसून गप्पांमध्ये रंगतील. तर घरात कपूर कुटुंबासोबत होणाऱ्या पार्ट्या देखील याच मजल्यावर होतील.

हेही वाचा: Boney Kapoor: ' सिनेमाचे पूर्ण पैसे घेऊन फक्त.... ', अक्षय कुमारच्या विरोधात बोनी कपूरचा सूर

आलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला होता. आलिया आणि तिची छोटी पोरी दोघीही हेल्दी असल्याचं कळत आहे. रणबीर कपूर,आलियाची आई सोनी राझदान आणि बहिण शाहीन भट्ट रिलायन्स हॉस्पिटलजवळ अनेकदा स्पॉट केले गेले. आलियाच्या मुलीची झलक पहायला सध्या तिचे चाहते उत्सुक आहेत. मात्र आलिया इतर सेलिब्रिटींप्रमाणे आपल्या मुलीचा चेहरा दाखवणार नाही असं राहून राहून चाहत्यांना वाटत आहे.