
आलियाने तिचं हे नवीन घर सजवण्याची जबाबदारी शाहरुख खानची पत्नी व इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिच्यावर सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अलियानं नव्यानं घर खरेदी केली आहे. या घराची किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अलियानं रणवीर कपूरच्याच इमारतीमध्ये एक महागडे घर घेतले आहे. ज्याची किंमत ऐकल्यास आपली झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. अलिया आणि रणवीरमध्ये वाढलेली जवळीक ही त्या नव्या घरामागील एक महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अलिया आणि रणवीर हे एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्याविषयी सोशल मीडियावर बरचं काही बोललं जात आहे. कोरोनाच्या काळात असलेल्या लॉकडाऊनच्या निमित्तानं दोघांनी बराच काळ एकत्र घालवल्याचे दिसून आले आहे. ती जवळीक अधिक घट्ट व्हावी यासाठी अलियानं तर घर घेतलं नाही ना, अशा प्रकारची मिश्किल टिप्पणी नेटकरी करत आहेत. पिंकव्हीलानं दिलेल्या एका वृत्तात आलियाच्या नव्या घराचा उल्लेख आला आहे. अलियाने रणबीरच्याच इमारतीत एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. रणबीर या इमारतीत 7 व्या मजल्यावर राहतो. तर,आता आलिया याच इमारतीत 5 व्या मजल्यावर राहणार आहे. आलियाचं नवीन घर 2460 स्क्वेअर फूटांचं असून त्याची किंमत मोठी आहे.
आलियाने तिचं हे नवीन घर सजवण्याची जबाबदारी शाहरुख खानची पत्नी व इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिच्यावर सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने या नव्या घरात लक्ष्मीपूजन केलं असून यावेळी तिचे कुटुंबीय, रणबीर कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी यावेळी हजर होते. जुहूमध्येही आलियाचं एक घर आहे. त्याची किंमत 13.11 कोटी रुपये आहे. आलियाच्या नव्या घराची किंमत 32 कोटी रुपये आहे. संपूर्ण इमारत 12 मजल्यांची आहे. सध्या आलिया तिच्या बहिणीसोबत जुहूमध्ये राहते.
जुन्या सिनेमाला नवीन तडका देणार सारा-वरुण, कुली नंबर वनचा ट्रेलर रिलीज
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील या नात्याला परवानगी असल्याचं सांगण्यात येतं आहे. लॉकडाउनच्या काळातदेखील या जोडीने त्यांचा बराचसा वेळ एकमेकांसोबत व्यतीत केला.