जुन्या सिनेमाला नवीन तडका देणार सारा-वरुण, कुली नंबर वनचा ट्रेलर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 28 November 2020

'कुली नंबर वन' गोविंदा आणि करिश्मा कपूर स्टटार १९९५ मध्ये आलेल्या 'कुली नंबर वन'चा रिमेक आहे. हा सिनेमा डेविड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा कुली नंबर वनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तप्रेत्रकांना अनेक दिवसांपासून या सिनेमाविषयी उत्सुकता होती. 'कुली नंबर वन' गोविंदा आणि करिश्मा कपूर स्टटार १९९५ मध्ये आलेल्या 'कुली नंबर वन'चा रिमेक आहे. हा सिनेमा डेविड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. 

व्हिडिओ: कपिल शर्माने आईसोबत केलं वर्कआऊट, एकमेकांना देत होते टक्कर  

कुली नंबर वनच्या या रिमेकमध्ये वरुण धवन, सारा अली खान, परेश राव, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादवसोबत इतर अनेक कलाकार आहेत. ट्रेलर रिलीज होण्याआधी वरुण धवनने सिनेमातील प्रसिद्ध गाणं मै तो रस्त से जा रहा था वर परफॉर्म केलं होतं. सारा आणि परेश रावल वरुण धवनसोबत या ट्रेलरसाठी चंदीगढमधून लाईव्ह जोडले गेले होते.

ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाची पूर्ण कास्ट सिनेमात नवीन तडका लावणार आहे. सिनेमाची गाणी पुन्हा एकदा तुम्हाला वेड लावतील असं म्हणायला हरकत नाही. ट्रेलरमध्ये वरुण धवनच्या डबल रोलचा ट्विस्ट टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. मात्र या ट्रेलरची खासियत अशी आहे की खरंच वरुण धवन कुली आहे जो परेश रावल आणि साराला उल्लु बनवतोय की मग खरंच सिनेमात वरुण धवनचा डबल रोल असेल असं कन्फ्युजन क्रिएट केलं आहे. कॉमेडीच्या बाबतीत मात्र वरुण प्रेक्षकांची मनं जिंकेल असं दिसतंय. आता लवकरंच सिनेमाची गाणी रिलीज झाल्यावर प्रेक्षकांना ती आवडतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.    

varun dhawan and sara ali khan film coolie no 1 trailer released watched here  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varun dhawan and sara ali khan film coolie no 1 trailer released watched here