esakal | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोना

बोलून बातमी शोधा

Allu arjun

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली. 'माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मी ताबडतोब स्वत:ला आयसोलेट केलंय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो. माझ्या चाहत्यांनी काळजी करू नका, मी ठीक आहे. सर्वांनी घरी राहा आणि सुरक्षित राहा', असं त्याने लिहिलं.

याआधी बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली. एस. एस. राजामौली, राम चरण, तमन्ना भाटिया, नागा बाबू, बंडला गणेश यांना कोरोना झाला होता.

हेही वाचा : राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी भाऊ-बहीण कोर्टात

अल्लू अर्जुनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'अला वैकुंठपुरामुलू' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडेने मुख्य भूमिका साकारली होती. तो लवकरच सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येत गेल्या २४ तासांत अंशत: घट नोंदविण्यात आली. मंगळवारी दिवसभरात देशात ३ लाख २३ हजार १४४ रुग्ण आढळले, तर २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला.