esakal | राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी भाऊ-बहीण कोर्टात

बोलून बातमी शोधा

Rajiv Kapoor
राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी भाऊ-बहीण कोर्टात
sakal_logo
By
स्वाती वेमूल

राज कपूर यांचे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता राजीव यांचे भाऊ रणधीर कपूर आणि बहीम रिमा जैन यांनी त्यांच्या संपत्तीवर अधिकार मागितला आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली असताना न्यायालयाने राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राजीव कपूर यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कोणाला माहित नाही. पत्नीसोबत मतभेदांमुळे ते विभक्त झाले होते. दोघं कधी सार्वजनिक ठिकाणी एकत्र समोर दिसलेही नाहीत. रणधीर कपूर आणि रिमा जैन यांच्या वकिलांनी म्हटलं की, राजीव यांच्या संपत्तीवर या दोघांचा हक्क आहे. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहेत.

हेही वाचा : दुसरं लग्न करणार का? मयुरी देशमुखचं विचारपूर्वक उत्तर

राजीव कपूर यांचं २००१ मध्ये आरती सबरवाल यांच्यासोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या दोनच वर्षांनंतर २००३ मध्ये दोघं विभक्त झाले. कोर्टात सुनावणीदरम्यान रणधीर आणि रिमा यांच्या वकिलांनी म्हटलं की त्यांच्याकडे राजीव आणि आरती यांच्या घटस्फोटाची कागदपत्रं नाहीत आणि कोणत्या कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली हेसुद्धा माहित नाही. रणधीर आणि रिमा हे दोघंच राजीव कपूर यांचे वारस आहेत, त्यामुळे घटस्फोटाची कागदपत्रं सादर करण्यापासून सूट देण्यात यावी अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली.

न्यायमूर्तींनी रजिस्ट्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे. पण त्याचसोबत याचिकाकर्त्यांना घटस्फोटाची कागदपत्रं शोधून काढण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले. जर सापडल्यास त्यांनी ते रजिस्ट्रीकडे पाठवण्यासही सांगण्यात आले.

कोण आहेत आरती सबरवाल?

आरती सबरवाल या आर्किटेक्ट आहेत. राजीव कपूर यांचे वडील राज कपूर यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यांच्या परवानगीशिवाय राजीव आणि आरती यांनी लग्न केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आरती सध्या कॅनडामध्ये राहतात.