अलीने अर्शिला केलं जॅस्मिनसमोर किस, जॅस्मिन भडकली आणि म्हणाली...

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 18 December 2020

प्रत्येक स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी या ना त्या प्रकारे प्रयत्न करत आहे.इतकंच नाही तर बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे अभिनेत्री अर्शी खान आणि अली गोनी यांच्यात मैत्री पलिकडलं नातं निर्माण झाल्याची चर्चा आहे.

मुंबई- 'बिग बॉस ' हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. आता तर १४ व्या सिझनमध्ये पुन्हा एकदा नव्याने माजी स्पर्धकांची एंट्री झाल्याने हा शो चर्चेत आहे. दररोज काही ना काही घडताना दिसतंय. परिणामी प्रत्येक स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी या ना त्या प्रकारे प्रयत्न करत आहे.इतकंच नाही तर बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे अभिनेत्री अर्शी खान आणि अली गोनी यांच्यात मैत्री पलिकडलं नातं निर्माण झाल्याची चर्चा आहे. नुकतंच अर्शी आणि अलीने सर्वांसमोर किस केलं. हे दृश्य पाहून अलीची खास मैत्रीण जॅस्मिन भसीन चांगलीच भडकली आहे.

हे ही वाचा: जैद दरबारसोबतच्या गौहरच्या लग्नावर एक्स बॉयफ्रेंड कुशाल म्हणाला, 'जर तिने मला..'   

 जॅस्मिन आणि अली 'बिग बॉस'च्या घराबाहेर एक मेकांना डेट करत होते अशी चर्चा आहे. यापुर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यांनी आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी शोमधील प्रत्येक टास्कमध्ये ते एकमेकांना भक्कम असा पाठिंबा देताना दिसले. शिवाय त्यांच्या खास नात्याबद्दल चर्चा देखील करताना दिसले. या पार्श्वभूमीवर अर्शी आणि अलीमध्ये निर्माण झालेली जवळीकता प्रेक्षकांना कोड्यात टाकणारी आहे.

जॅस्मिननं देखील दोघांना किस करताना पाहून संताप व्यक्त केला आहे. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असं म्हणत जॅस्मिनने त्या दृश्याबाबत अलीकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. 'बिग बॉस' रिऍलिटी शोच्या इतिहासात आजपर्यंत अनेकदा असा लव्ह ट्रँगल पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्शी, अली आणि जॅस्मीनमध्ये आता नेमकं काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

aly goni kisses arshi khan in front of jasmine bhasin  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aly goni kisses arshi khan in front of jasmine bhasin