जैद दरबारसोबतच्या गौहरच्या लग्नावर एक्स बॉयफ्रेंड कुशाल म्हणाला, 'जर तिने मला..'

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 18 December 2020

हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे अनेकदा चर्चेत असलेली गौहर खान सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने अभिनेता जैद दरबारसोबत लग्न करत असल्याची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून केली होती.

मुंबई- गौहर खान आणि कुशाल टंडन यांची लव्हस्टोरी 'बिग बॉस ७'मधून सुरु झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत एक म्युझिक व्हिडिओ देखील केला होता मात्र काही कारणांमुळे त्यांच ब्रेकअप झालं.  हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे अनेकदा चर्चेत असलेली गौहर खान सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने अभिनेता जैद दरबारसोबत लग्न करत असल्याची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून केली होती. नुकतंच तिने तिच्या प्रीवेडिंग ग्लॅमरस फोटोशूटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यादरम्यान गौहरचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडने तिच्या जैदसोबतच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा: कुणाल कामरा आणि रचिता तनेजाला सुप्रीम कोर्टाने बजावली कारणे दाखवा नोटीस    

कुशाल टंडनने ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गैहरसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, “कितीही प्रयत्न केला तरी काही नाती दिर्घकाळ टिकत नाहीत. आमच्या बाबतीतही तेच घडलं आणि आमचं ब्रेकअप झालं. आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो असलो तरी देखील आमच्यात मैत्रीचे संबंध आजही आहेत. ती लग्न करतेय हे पाहून मला खूप आनंद झाला. मी देवाकडे तिच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो.

गौहरने जर मला लग्नाला बोलावलं तर मला नक्की जायला आवडेल. पण कदाचित त्यावेळी मी शूटिंग करत असेन. त्यामुळे मला नक्की सांगता येणार नाही की मी तिच्या लग्नात हजर राहू शकेन की नाही.  जर मी फ्री असेन आणि त्यावेळी माझ्याकडे काही काम नसेल तर मी नक्की जाऊन तिला शुभेच्छा देईन.” कुशलच्या या वक्तव्यावर गौहरने अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कुशालला जेव्हा विचारलं गेलं की तो लग्न करणार की नाही यावर तो म्हणाला, ''माहिती नाही. जेव्हा लग्नाची योग्य वेळ येईल तेव्हा करेन. मात्र सध्या तरी मला माहित नाही की माझी होणारी पत्नी कुठे आहे. आशा करतो की जेव्हा कधी ती मला भेटेल ती चांगल्या आणि स्वच्छ मनाची असू दे.''  

kushal tandon says will attend ex girlfriend gauahar khan wedding ifshe invites him  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kushal tandon says will attend ex girlfriend gauahar khan wedding ifshe invites him