esakal | गायक अमाल मलिकचं सलमान खानच्या चाहत्यांसोबत ट्विटरवॉर, शिव्या देणा-यांना दिलं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

amal malik on salman fans

अमालने स्वतःला शाहरुखचा चाहता म्हटल्यामुळे सलमान खानचे चाहते भडकले आणि मग अमाल आणि सलमानच्या चाहत्यांमध्ये ट्विटरवॉर सुरु झालं.

गायक अमाल मलिकचं सलमान खानच्या चाहत्यांसोबत ट्विटरवॉर, शिव्या देणा-यांना दिलं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- ट्विटरवर सेलिब्रिटींना सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे यासाठी कोणत्या सेलिब्रिटींनी वादग्रस्त विधान करण्याची गरजही नसते तर स्वतः ट्रोलर्सच त्यांची आवड निवड सांगण्यासाठी त्यांच्या मागे हात धुवुन लागतात. असंच काहीसं घडलंय ते संगीतकार आणि गायक अमाल मलिकसोबत. अमालने स्वतःला शाहरुखचा चाहता म्हटल्यामुळे सलमान खानचे चाहते भडकले आणि मग अमाल आणि सलमानच्या चाहत्यांमध्ये ट्विटरवॉर सुरु झालं.

हे ही वाचा: जान्हवी कपूर ट्रोलर्समुळे हैराण, लोक म्हणतात 'बरं झालं तुझी आई...'

त्याचं झालं असं की अमाल मलिकने एका मुलाखतीत सांगितलं की तो शाहरुख खानचा फॅन आहे. ही गोष्ट सलमानच्या चाहत्यांना पसंत पडली नाही आणि त्यांनी अमालला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सलमानने अमालला त्याच्या जय हो या सिनेमातून पहिला ब्रेक दिला असल्याने सलमानचे चाहते त्याच्यावर भडकले आहेत. अमाल मलिकने ट्विट करत म्हटलं आहे, 'आज जगाला दिसलं की या अशिक्षित भैताडांची काय लायकी आहे ते. हे सगळं शाहरुख खान माझा आवडता असल्याचं म्हटल्याने सुरु झालं आणि हे मुर्ख वेडे झाले. मी सलमान खानचा आदर करतो. त्याने मला लॉन्च केलं. मात्र याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या चाहत्यांचा मुर्खपणा सहन करेन'.

अमालला ट्रोल करत एकाने लिहिलं होतं की, 'खरंच हे पाहुन आम्ही आश्चर्यचकित झालो. मुलींसाठी देखील अशा गलिच्छ भाषेचा उपयोग. तुम्ही तर त्या ट्रोलर्सपेक्षाही वाईट भाषेचा वापर केला. कधीही कोणत्या सेलिब्रिटींना सोशल मिडियावर अशी थर्ड क्लास ऍक्टीव्हिटी करताना पाहिलं नाही.' यावरंच ट्रोलर्स थांबले नाहीत तर त्यांनी अमालला शिवीगाळ करायला सुरुवात केली. 

अमाल मलिकचा हे बघून पारा चढला आणि त्याने शिव्यांच्या बदली शिव्याच द्यायला सुरुवात केली. कित्येक तास हे ट्विटरवॉर सुरु होतं. त्यानंतर पुन्हा एकदा अमालने ट्विट करत म्हटलं, 'हे पाहुन चांगलं वाटतंय की भैताड्स माझ्या ट्विटना रिपोर्ट करत आहेत आणि स्वतःचे ट्विट डिलीट करत आहेत. तुमची स्वतःची आवड आहे माझी स्वतःची आवड आहे. कितीवेळा लिहावं लागेल. हे लोक इज्जत जाऊनंही थकत नाहीत.'  

amaal mallik hits back at salman khan fans who trolled him  

loading image
go to top