esakal | जान्हवी कपूर ट्रोलर्समुळे हैराण, लोक म्हणतात 'बरं झालं तुझी आई...'
sakal

बोलून बातमी शोधा

janhavi kapoor

जान्हवीला तिच्या अभिनयासाठी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं. जान्हवीचा पहिला सिनेमा धडकच्यावेळीही लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. आजही ती या गोष्टी विसरलेली नाही.

जान्हवी कपूर ट्रोलर्समुळे हैराण, लोक म्हणतात 'बरं झालं तुझी आई...'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकताच गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचं सगळ्यांनी भरपूर कौतुक केलं. मात्र जान्हवीच्या अभिनयाने चाहते मात्र यावेळीही खुश नव्हते. जान्हवीला तिच्या अभिनयासाठी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं. जान्हवीचा पहिला सिनेमा धडकच्यावेळीही लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. आजही ती या गोष्टी विसरलेली नाही.

हे ही वाचा: 'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, 'या' कारणामुळे शो उशीरा सुरु होणार

सध्या सोशल मिडियावर स्टारकिड्समुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अनेकदा नेपोटिझम या मुद्यामुळे स्टारकिड्स चर्चेत येतात आणि त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. जान्हवी कपूर देखील स्टारकिड आहे. मात्र ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्ट्रगल करत आहे. जान्हवीला ऑनलाईन ट्रोलर्सची अजिबात चिंता नाहीये. कारण जान्हवीने सांगितलंय की तिला कोणत्या पातळीपर्यंत ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.

जान्हवीने धडक या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून जान्हवीला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. तिने सांगितलं जेव्हा तिचा पहिला सिनेमा 'धडक' रिलीज झाला  तेव्हा लोकांनी या पातळीपर्यंत जाऊन कमेंट्स केल्या की 'बरं झालं हे पाहण्यासाठी तुझी आई आज या जगात नाहीये.' ती म्हणाली की 'ही गोष्ट मी मनाला लावून दुःखी झाली नाही. उलट टीकांकडे मी एका संधीप्रमाणे पाहते जेणेकरुन स्वतःमध्ये सुधारणा करु शकेल.'

'धडक', आणि 'गुंजन सक्सेनाःद कारगिल गर्ल' या सिनेमानंतर जान्हवी 'दोस्ताना २' सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात जान्हवीसोबत अभिनेता कार्तिक आर्यन दिसून येईल.   

janhvi kapoor about online trolls i got comments like good that your mother is not around to see this  

loading image
go to top