स्वतःच्या 'न्यूड सीन'वर काय म्हणाली अमला?

Amala Paul react on her Nude scene in Malyali Film Aadai
Amala Paul react on her Nude scene in Malyali Film Aadai

अमला पॉल ही दक्षिणेतील अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या 'न्यूड सीन'मुळे! तिच्या आगामी 'आदाई' या मल्याळी चित्रपटाचे दोन टीझर रिलीज झाले आहेत. यातील एका टीझरमध्ये ती विवस्त्र बसलेली आहे. या सीनमुळे खूप चर्चा झाली. अखेर तिने यावर भाष्य केले आहे. 

न्यूड सीन कसा दिला या प्रश्नावर तिने परखड व कृतज्ञपूर्ण उत्तर दिले. 'माझा प्रॉडक्शन टीममधील क्र्यू मेंबर्सवर विश्वास नसता, तर मी हा सीन करू शकले नसते. चित्रपटाचे 15 क्र्यू व दिग्दर्शक रतन कुमार यांनी विश्वास ठेवल्यामुळे मी हा सीन आत्मविश्वासाने करू शकले.' अशी भावना तिने 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. 'दारू प्यायलेली एक मुलगी हारवते, तिची आई तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, अखेर ती विवस्त्र आणि भेदरलेल्या अवस्थेत एका ऑफिसमध्ये सापडते...' पुढे काय होते हे याबद्दल उत्सुकता या टीझरमध्ये दाखवली आहे.

अमलाने काल दुसरे टीझर लॉन्च झाल्यावर प्रेक्षकांचे अभार मानणारे ट्विटही केले आहे. हा रसहस्यमयी चित्रपट कसा असले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com