'अरंगेत्रम' सोहळा म्हणजे काय?अंबानी कुटुंबानं होणाऱ्या सुनेसाठी घातला थाट

अंबानी कुटुंबानं आयोजित केलेल्या या अरंगेत्रम सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Ambanis organise Radhika Merchant's Arangetram at Jio World Center, Bollywood celebs attend
Ambanis organise Radhika Merchant's Arangetram at Jio World Center, Bollywood celebs attendGoogle

मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानीनं आपली होणारी सून राधिका मर्चंट(Radhika Merchant) साठी रविवारी ५ जून,२०२२ रोजी Arangetram सोहळ्याचं आयोजन केलं होतं,ज्यामध्ये सिनेमाआणि क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. हा भव्य-दिव्य सोहळा जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केला गेला होता.

Arangetram सोहळ्याविषयी आपल्या सगळ्यांनाच कदाचित जाणून घ्यायची उत्सुकता असेल. नेमकं कसं सेलिब्रेशन असतं या सोहळ्यात. तर या सोहळ्यात एक क्लासिकल डान्सर पहिल्यांदा स्टेजवर सर्वांसमोर परफॉर्मन्स करतात. हा एक तामिळ शब्द आहे,ज्याचा अर्थ आहे एक क्लासिकल डान्सर आपलं फॉर्मल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर स्टेजवर सर्वांससमोर परफॉर्म करतो किंवा करते.

राधिका मर्चंट इंडस्ट्रिअलिस्ट वीरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे,जी एक क्लासिकल डान्सर देखील आहे. ती खूप वर्षांपासून ही नृत्यकला शिकत आहे. आता जेव्हा तिचं यातलं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी Arangetram सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. यो सोहळ्यात राधिका मर्चंटच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Ambanis organise Radhika Merchant's Arangetram at Jio World Center, Bollywood celebs attend
IIFA 2022: विकी कौशलनं पुन्हा केलं लग्न? वरातीचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याशी राधिका मर्चंटचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर ती अनेकदा अंबानी कुटुंबाच्या सगळ्याच सोहळ्यात दिसलेली आहे.

या सेरीमनीला सलमान खानपासून(Salman Khan) रणवीर सिंग,आमिर खान(Aamair Khan),राजकुमार हिरानी,मीजान जाफरी,जहीर खान ,सागरिका घाटगे अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेरिमनीला मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता देखील आपल्या लहानग्याला म्हणजे पृथ्वी अंबानीला घेऊन उपस्थित राहिली होती. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) देखील आपली आई आणि धाकट्या भावासोबत या सोहळ्याला पोहोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com