अभिनेत्री अमीषा पटेलसमोर एअरलाईन स्टाफने केला 'कहो ना प्यार है डान्स', भावूक झाली अमीषा

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 26 December 2020

सोशल मिडियावर सध्या अमीषा पटेलचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये अमीषासाठी एअरलाईन स्टाफने 'कहो ना प्यार है'च्या टायटल साँगवर डान्स केला आहे.

मुंबई- 'कहो ना प्यार है' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अमीषा पटेल गेल्या अनेक काळापासून बॉलीवूडपासून लांब आहे. अमिषा अनेक काळापासून सिनेमांमध्ये दिसून आलेली नाही. अमिषाचा पहिला सिनेमा कहो ना प्यार है सुपरहिट झाला होता. बॉक्स ऑफीसवर या सिनेमाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. अमीषा पटेलसोबत या सिनेमामध्ये हृतिक रोशन देखील होता. मात्र या सिनेमानंतर तिचं करिअर फार काही यशस्वी ठरलं नाही. मात्र चाहत्यांमध्ये अजुनही अमीषाच्या 'कहो ना प्यार है'ची जादू पाहायला मिळते. 

हे ही वाचा: तमिळ सिनेमा 'विक्रम-वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये 'या' अभिनेत्याने केलं आमिर खानला रिप्लेस  

सोशल मिडियावर सध्या अमीषा पटेलचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये अमीषासाठी एअरलाईन स्टाफने 'कहो ना प्यार है'च्या टायटल साँगवर डान्स केला आहे. जे पाहुन अमीषा खूप भावूक झाली. सगळ्यात आधी अमीषा तिला मिळालेल्या एवढ्या प्रेमाने खूप भारावून जाते आणि रडायलाच लागते. आणि मग त्यानंतर स्वतः त्या स्टाफसोबत जाऊन डान्स करते. 

अमीषा पटेल नुकतीच एका कामानिमित्त शहराबाहेर गेली होती. अशातंच एअरलाईन स्टाफने त्यांना सरप्राईज देत हा स्पेशल परफॉर्मन्स सादर केला. हा खास परफॉर्मन्स पाहून  अमीषाला अश्रु अनावर झाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय. अमीषाचे आणि या गाण्याचे चाहते तिचा हा व्हिडिओ पाहुन आनंद व्यक्त करत आहेत. यासोबतंच तिला पडद्यावर मिस करत असल्याचं देखील म्हणत आहेत.   

ameesha patel gets emotion as she watches airline staff dance performance on her song kaho na pyaar hai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ameesha patel gets emotion as she watches airline staff dance performance on her song kaho na pyaar hai