तमिळ सिनेमा 'विक्रम-वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये 'या' अभिनेत्याने केलं आमिर खानला रिप्लेस

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 26 December 2020

आमिर खानला या सिनेमाची स्क्रीप्ट खूप पसंत पडली होती. मात्र नंतर स्क्रीनप्ले वाचल्यानंतर त्याने या सिनेमासाठी फार इंटरेस्ट दाखवला नाही.

मुंबई- काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की परफेक्शनिस्ट आमिर खान तमिळचा सुपरहिट सिनेमा 'विक्रम-वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसून येणार आहे. आमिर खानला या सिनेमाची स्क्रीप्ट खूप पसंत पडली होती. मात्र नंतर स्क्रीनप्ले वाचल्यानंतर त्याने या सिनेमासाठी फार इंटरेस्ट दाखवला नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःला या सिनेमापासून वेगळं केलं. या सिनेमात सैफअली खान देखील दिसून येणार असल्याचं कळत होतं. रिपोर्टनुसार, सैफअली खान अजुनही या सिनेमाचा भाग आहे मात्र आमिर खान आता या सिनेमाचा भाग नाहीये. या सिनेमाशी संबंधित एक मोठी बातमी आता समोर येत आहे. 

हे ही वाचा: रजनीकांत हेल्थ अपडेट: आजही हॉस्पिटलमध्ये राहणार रजनीकांत, प्रकृती स्थिर  

एका वेबपोर्टलने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका सुत्राने सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन या सिनेमामुळे चर्चेत आहे. इतकंच नाही तर  सगळ्यात पहिले आमिरच्या आधी हृतिक रोशनलाच विचारणा केली होती मात्र त्यावेळी गोष्टी काही ठिक नव्हत्या. पण म्हणतात ना जीवनचक्र परतुन तिथेच येतं तसंच काहीसं या सिनेमाच्या बाबतीत झालं आहे. आता आमिरने यातून स्वतःला वेगळं केल्यानंतर हृतिकने या सिनेमाची ऑफर स्विकारली आहे.

हृतिक रोशनचा हा सिनेमा म्हणजे त्याची सिल्व्हर जुब्ली असणार आहे. 'विक्रम-वेधा'चा हा हिंदी रिमेक शूट करण्याआधी हृतिक रोशन त्याची डिजीटल वेबसिरीज 'नाइट मॅनेजर'ची शूटींग पूर्ण करणार आहे. याव्यरिक्त हृतिककडे 'क्रिश-४', 'फायटर्स' आणि 'वॉर -२' यांसारखे सिनेमे आहेत. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या तमिळ सुपरहिट सिनेमा 'विक्रम-वेधा' एक क्राईम थ्रिलर आहे ज्यामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.   

hrithik roshan to work in the hindi remake of tamil superhit film vikram vedha  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrithik roshan to work in the hindi remake of tamil superhit film vikram vedha