Michael Jackson : 150 वर्ष जगायचं होतं, 12 डॉक्टरांची टीम असायची नेहमी सोबत!|American Popstar Michael Jackson death Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American Popstar Michael Jackson

Michael Jackson : 150 वर्ष जगायचं होतं, 12 डॉक्टरांची टीम असायची नेहमी सोबत!

Michael Jackson Death Anniversary: जगभरातील संगीत रसिकांना मायकेल जॅक्सनचं नाव परिचित आहे. ज्यानं आपल्या गायकीनं आणि नृत्यानं साऱ्या जगाला वेडं केलं त्या मायकेलच्या बाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सोशल (pop singer) मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना मायकलच्या व्यक्तिमत्वांबद्दल कमालीचे आकर्षण आहे. तो गेल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके प्रसिद्ध झाली. मायकलचं गरीबीतील बालपण, त्याचा संघर्ष, (hollywood star) वर्णभेदाचा त्याला करावा लागलेला सामना याचा परिणाम त्याच्या गाण्यावर झाला होता. त्यातून हे सगळं प्रतिबिंबीत झाले होते.Michael Jackson Death Anniversary News

जगातील सर्वात प्रभावशाली पॉपस्टार (Popstar) अशी मायकेल जॅक्सनची ओळख होती. त्याला काही करुन प्रसिद्धी हवी होती. ज्या प्रसिद्धीसाठी त्यानं अतोनात (Entertainment News) संघर्ष केला त्यानंतर त्याला मिळालेल्या प्रसिद्धीनं मायकेल वेडा झाला होता. त्याला वेगवेगळी व्यसनंही होती. प्रसिध्दीच्या झोतात वेडावलेल्या मायकेलचे शौकही वेगळेच होते. त्यानं चेहऱ्यावर केलेली सर्जरी ही त्यावेळी चर्चेत आली होती. असं म्ह्टलं जातं की, त्याला दीडशे वर्षाचं आयुष्य हवं होतं. त्यासाठी तो नेहमी काळजी घेत असे. नेहमी एका वेगळ्या भीतीत वावरणाऱ्या मायकेलनं स्वताच्या देखभालीसाठी 12 डॉक्टरांची टीम सदैव तैनात ठेवली होती.

25 जुन 2009 मध्ये मायकेलनं जगाचा निरोप घेतला. लॉस एंजेलिसमध्ये त्याला लाखो चाहत्यांनी अलविदा केलं. त्याच्या अंत्ययात्रेला असणाऱ्या गर्दीचे फोटो मायकेलच्या लोकप्रियतेची साक्ष देणारे आहेत. वयाच्या अवघ्या पन्नाशीमध्ये त्याचा मृत्यु झाला. मायकेलबद्दलच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. 29 ऑगस्टला मायकेलचा जन्म इंडियाना प्रांतातील एका शहरात झाला होता. लहापणापासून त्याला संगीतात मोठी रुची होती. आपण मोठेपणी पॉप सिंगर व्हायचं हे त्यानं ठरवून टाकलं होतं. 1982 मध्ये मायकेलचा थ्रिलर नावाचा अल्बम प्रकाशित झाला. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.

हेही वाचा: Ram Gopal Varma: 'द्रौपदी राष्ट्रपती तर पांडव कोण?' BJP कडून तक्रार

जगात सर्वाधिक विक्री झालेला अल्बम असा विक्रम मायकेलच्या नावावर आहे. मायकेलला 150 वर्षांचं आयुष्य हवं होतं. त्यामुळे तो नेहमी डॉक्टरांची एक टीम नेहमी बरोबर ठेवत असे. ती टीम सतत त्याच्या आरोग्याची तपासणी करत असे. ज्याठिकाणी मायकेलचा शो आहे त्यापूर्वी पूर्ण मायकेलची तपासणी, तो शो संपल्यानंतर पुन्हा तपासणी असं मायकेलच्या आरोग्याचे वेळापत्रक होते.

हेही वाचा: Kitchen Kalakar Video: 'किचन कल्लाकार'च्या सेटवर बोलका कोबी

Web Title: American Pop Star Michael Jackson Death Anniversary Interesting Facts Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top