Selena Gomez: 'मी नैसर्गिकरित्या कधीच आई बनू शकणार नाही', अमेरिकन सिंगरचा कारण सांगत मोठा खुलासा American Singer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American Singer Selena Gomez on Pregnancy

Selena Gomez: 'मी नैसर्गिकरित्या कधीच आई बनू शकणार नाही', अमेरिकन सिंगरचा कारण सांगत मोठा खुलासा

Selena Gomez: अमेरिकन गायिका सेलेना गोमेज जगभरात प्रसिद्ध आहे. ती आपल्या गाण्यांमुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असलेली पहायला मिळते. तिनं काही दिवसांपूर्वीच खुलासा केला आहे की,तिला वाटतं की ती कधीच आई बनू शकत नाही. कधीच मुलांना जन्म देऊ शकत नाही. आणि हे सगळं आपल्याला असलेल्या एका आजारावर आपण जी औषधं घेत आहोत त्यामुळे होऊ शकतं असं सेलेनाला वाटत आहे. सेलेनानं २०२० मध्ये आपल्या या आजाराचा खुलासा केला होता.(Selena Gomez on Pregnancy)

हेही वाचा: Varun Dhawan ला झालाय 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' हा विचित्र आजार; म्हणाला,'माझ्या शरीराचा...'

सेलेना गोमेजने दोन वर्षापूर्वी इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन दरम्यान खुलासा केला होता की ती बोयोपोलर डिसऑर्डर या आजाराचा सामना करत आहे, हा एक मानसिक आजार आहे. ती म्हणाली होती,''गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या आजारासंदर्भातील समस्यांचा सामना केल्यानंतर मला लक्षात आलं की मी बायोपोलर आजाराने त्रस्त आहे. पण एकदा या आजारा संदर्भात सर्व गोष्टी कळल्यानंतर मला याची भीती वाटणं बंद झालं. मला वाटतं की लोकं उगाच अशा आजाराला घाबरतात''.

सेलेना गोमेजनं नुकतेच तिच्या भविष्यातील प्लॅन्स संदर्भातही काही खुलासे केले आहेत. तिनं म्हटलं आहे की,''तिला तिचं कुटुंब वाढवायला आता आवडेल पण ती खात असलेल्या औषधांमुळे हे तिच्यासाठी कदाचित धोक्याचं ठरू शकतं. सेलेनाला वाटतं की जेव्हा ती आई बनण्याचा विचार करेल तेव्हा तिला नैसर्गिक पद्धतीनं नाही तर अन्य वैद्यकीय पद्धतींच्या मदतीनं मुलाला जन्म द्यावा लागेल''.

२०१४ मध्ये सेलेनाला luspus च्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. त्यानंतर तिचे किडनी ट्रान्सप्लांटही झाले होते. तिची जवळची खास मैत्रिण Francia Raisa नं तिला किडनी दिली होती. सेलेनानं काही दिवसांपूर्वीच आपली My Mind & Me ही डॉक्युमेन्ट्री रिलीज केली. ज्यामध्ये तिच्या करिअरमधील अनेक उतार-चढाव दाखवण्यात आले आहेत.

टॅग्स :hollywood