Amey Wagh: 'जंगलात वाघ एकटाच असतो...' अमेय कुणावर चिडला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amey Wagh

Amey Wagh: 'जंगलात वाघ एकटाच असतो...' अमेय कुणावर चिडला?

Amey Wagh: मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून अमेय वाघचे नाव घेता येईल. त्यानं अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला आघाडीचा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. सोशल मीडियावर अमेय हा नेहमीच अॅक्टिव्ह असतो. चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याला फॉलो करणारा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या अमेय हा त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

अमेयनं फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं जंगलात राघू Sumeet Raghvan खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो... याची कृपया नोंद घ्यावी. असं म्हटलं आहे. त्याची ही सुचक पोस्ट चाहत्यांना भावली आहे. काही वेळेपूर्वी त्यानं केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्याला काही नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारले आहेत. जसे की फास्टर फेणेच्या वेळचा हा वाद आहे का, असं काय झालं की अमेय हा सुमित राघवन यांच्यावर चिडला आहे, अमेय हा एकटाच वाघ आहे.... अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट त्या पोस्टवर आल्या आहेत.

हेही वाचा: National Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दी

अनेकांनी सुमित आणि अमेय यांच्यात झालेला वाद त्यानंतर अमेयनं केलेली पोस्ट असा तर्क बांधला आहे. बाकी काही का असेना मात्र त्यांच्यातील हा वाद सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. अमेयच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्समधून त्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

हेही वाचा: Oscar Nominations 2023: ‘छेलो शो' ची ऑस्करवारी संकटात? 'कॉपी'चा आरोप!