Oscar Nominations 2023: ‘छेलो शो' ची ऑस्करवारी संकटात? 'कॉपी'चा आरोप!

छेलो शो हा ऑस्कर विजेत्या सिनेमा पॅराडिसो नावाच्या चित्रपटावर आधारित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वाद समोर आला आहे.
Oscar Nominations 2023
Oscar Nominations 2023esakal

Oscar Nominations 2023: प्रसिद्ध दिग्दर्शक पॅन नलिन यांच्या गुजराती छेलो शो ( द लास्ट शो) ला ऑस्करचं नामांकन मिळालं. मात्र त्याचा आनंद हा काही फार (Chhello Show Movie) वेळ टिकेल असे दिसत नाही. त्या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहे. आता या चित्रपटावर एका हॉलीवूड चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात गुजराती चित्रपट छेलोची ऑस्करसाठी अधिकृत इंट्री झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसते आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यासाठी छेलो शो चे नाव समोर आले आहे. यापूर्वी विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स, राजामौली यांचा आरआरआर या चित्रपटांची नावंही समोर आली होती. आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईजने हा चित्रपट एका हॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे छेलो शो पुढे एक नवे आव्हान तयार झाले आहे. दुसऱ्या एकानं या चित्रपटाला सिनेमा पॅराडिसोची कॉपी असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

यावर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं निवड प्रक्रियेबाबत सावध भूमिका घेतली आहे. जर छेलो शो हा हा सिनेमा पॅराडिसोवर ची कॉपी असेल तर मात्र त्याचा प्रवास हा संपुष्टात येईल. असे म्हटले आहे. ऑस्करच्या पहिल्या फेरीतूनच हा चित्रपट बाहेर पडण्याची शक्यता आहे. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपटांनी आपल्या स्वताचा विचार मांडण्याची पहिली अट आहे. स्पर्धेत सहभागी होणारा चित्रपट हा इतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाची कॉपी असता कामा नये. असेही संकेत आहे. यापूर्वी भारताकडून गली बॉय हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. मात्र तो देखील हॉलीवूडच्या 8 एम एम या चित्रपटावर आधारित असल्यानं त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

Oscar Nominations 2023
Heart Of Stone: 'ब्रम्हास्त्र'तून थेट 'हॉलीवूड'मध्ये, आलियाची चांदी!

छेलो शोवर एफडब्लुआईसीईनं देखील आरोप केला आहे. त्यात त्यांनी हा चित्रपट सिनेमा पॅराडिसोवर आधारित असल्याचे म्हटले आहे. भारताकडून दरवर्षी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ऑस्करसाठी एक चित्रपट पाठवला जातो. यावर्षी छेलो शोची निवड करण्यात आली होती. आता त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

Oscar Nominations 2023
Rakhi Sawant: 'राखीशी लग्न नको रे बाबा!' बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com