Ameya Khopkar: असा चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही! अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ameya Khopkar shared tweet on vaalvi marathi movie subodh bhave anita date shivani surve swapnil joshi

Ameya Khopkar: असा चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही! अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले..

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे (maharashtra navnirman chitrapat sena) अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) हे वारंवार कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह , प्राईम टाइम मिळण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना पाठिंबा असतो. आज मात्र अमेय खोपकर यांनी एका मराठी चित्रपटा बाबत महत्वाचं ट्विट केलं आहे.

(Ameya Khopkar shared tweet on vaalvi marathi movie subodh bhave anita date shivani surve swapnil joshi)

सध्या मराठीत 'वाळवी' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अत्यंत गूढ उकलणारा असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. नुकताच मनसे नेते अमेय खोपकर यांनीही हा चित्रपट पाहिला. ते स्वतः निर्माते आहेत,पण या चित्रपटा विषयी त्यांनी लिहिलेलं ट्विट लक्षवेधी ठरलं आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

या ट्विट मध्ये अमेय खोपकर म्हणाले आहेत, '‘वाळवी’ हा चित्रपट प्रत्येक चित्रपटरसिकाने आवर्जून पहावा असा आहे. इतका उत्कंठावर्धक चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा प्रत्येक बाबतीत या चित्रपटाने अव्वल कामगिरी केलेली आहे. परेश मोकाशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन'

केवळ अमेयच नाही तर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनीता दाते, शिवानी सुर्वे, स्वप्नील जोशी, सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहेत. तर परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे.

हेही वाचा: Ved Movie Box Office Collection: फक्त काही तास आणि 50 कोटी! रितेशचा 'वेड' रचणार नवा विक्रम..

आता तर 'वाळवी' पाहण्यासाठी एक स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. 'सिने लव्हर्स डे'च्या निमित्ताने 20 जानेवारीला ‘वाळवी’ फक्त रु. ९९/- मध्ये दाखवण्यात येणार आहे.