esakal | आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका; BYJUs ने थांबवल्या जाहिराती
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh khan

बायजू हा शाहरुखच्या सर्वांत मोठ्या स्पॉन्सरशिप डिल्सपैकी एक आहे.

आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका; BYJUs ने थांबवल्या जाहिराती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुलगा आर्यन खानच्या Aryan Khan अटकेचा मोठा फटका अभिनेता शाहरुख खानला Shah Rukh Khan बसला आहे. लर्निंग अ‍ॅप बायजूने (Byju) शाहरुखच्या सर्व जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्जप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी आर्यनचा जामीन फेटाळला. त्यानंतर इतर आरोपींसोबत त्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बायजूने त्यांच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या जाहिरातींसाठी बायजूने शाहरुखसोबत अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली होती.

बायजू हा शाहरुखच्या सर्वांत मोठ्या स्पॉन्सरशिप डिल्सपैकी एक आहे. याशिवाय किंग खान हा हुंडाई, एलजी, दुबई टुरिझ्म, आयसीआयसीआय आणि रिलायन्स जिओ यांसारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींचा चेहरा आहे. 'ईटी'च्या रिपोर्टनुसार, बायजूकडून त्यांच्या ब्रँड एडोर्समेंटसाठी दरवर्षी जवळपास तीन ते चार कोटी रुपये शाहरुखला देण्यात येतात. २०१७ पासून शाहरुख बायजूचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

हेही वाचा: आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही वर्षांत बायजू या स्टार्टअपने चांगलाच व्यवसाय केला. बायजूने शाहरुखला त्यांच्या जाहिरातींच्या करारामधून पूर्णपणे हटवलं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एप्रिल महिन्यात बायजूचे मूल्य १६.५ अब्ज डॉलर्स इतकं होतं. आयआयएफएल (IIFL) वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार कंपनीचे संस्थापक बायजू रविंद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती ही २४,३०० कोटी रुपये इतकी आहे.

loading image
go to top