esakal | Video: आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

gauri aryan khan

आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.

आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Cruise Drugs Bust: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान Aryan Khan याचा जामीन अर्ज मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगर दंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाने नमूद केलं. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये आर्यनची आई गौरी खान Gauri Khan रडत असल्याचं पहायला मिळतंय. मुलाला जामीन न मिळाल्याने गौरीला अश्रू अनावर झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळण्यात आली नाही. मात्र कारमधून बसून रडणारी महिला ही गौरीच असल्याचं म्हटलं जातं आहे. आर्यन एनसीबी कोठडीत असतानाही त्याच्या खाण्याची चिंता वाटल्याने गौरी बर्गर घेऊन गेली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्गरला नकार दिला होता.

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

आर्थर रोड तुरुंगाच्या बराक क्रमांक १ मध्ये आर्यन आणि अरबाजला ठेवण्यात आलं आहे. या दोघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना तुरुंगात क्वारंटाइन करण्यात आलं. कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते.

loading image
go to top