मुंबईत कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद होत असताना बॉलिवूड सेलिब्रिटींची जंगी पार्टी

celebs
celebs

एकीकडे मुंबईत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटी पार्टी करण्यासाठी एकत्र जमले होते. अभिनेत्री अमृता अरोराने तिच्या घरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला तिची बहीण मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर, करण जोहर, करिश्मा कपूर, गौरी खान, मनिष मल्होत्रा, संजय कपूर यांची पत्नी महीप, सोहैल खानची पत्नी सीमा खान आणि इतरही सेलिब्रिटी हजर होते. पार्टीला हजर असलेल्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अशा प्रकारच्या पार्टीचं आयोजन करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. 

या पार्टीतील मलायका-अर्जुनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. हे दोघंही क्वारंटाइनमध्ये राहत होते. तर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाहीवरून आरोप झाल्याने करण जोहर बरेच दिवस लाइमलाइटपासून दूर होता. आता पुन्हा एकदा तो बॉलिवूड पार्ट्यांमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spicewithsam (@spicewithsam)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

मुंबईत कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद
मुंबईत गेल्या २४ तासांत आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ५,१८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी मुंबईत ३५१२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोना बाधितांची मुंबईतील संख्या ३ लाख ७४ हजार ६११ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ११ हजार ६०६ वर पोहोचला आहे. चाचण्यांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कडक निर्बंध, आवश्यक व्यवस्था उभारणे आणि लसीकरणावर लक्ष देण्यात येणार आहे, असं मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी स्पष्ट केलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com