
दहा वर्षांची मैत्री, चार वर्षांच्या संसारानंतर समंथा-नाग चैतन्य विभक्त
Samantha |"ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला"
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने Samantha Ruth Prabhu तिच्या घटस्फोटानंतर मौन सोडलं आहे. समंथावर केल्या जाणाऱ्या अनेक आरोपांबाबत ती व्यक्त झाली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित तिने साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. त्याचसोबत अफवांनी मी खचून जाणार नाही, असं तिने ठामपणे म्हटलंय.
समंथाची पोस्ट-
'माझ्या वैयक्तिक संकटामध्ये तुम्ही जी मला भावनिक सहानुभूती दिली, ते पाहून मी खरोखर भारावून गेली आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल, काळजीबद्दल आणि खोट्या अफवांपासून माझा बचाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, या गोष्टींमुळे आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

याआधीही समंथाने राग व्यक्त केला होता. 'जेव्हा महिलांशी संबंधित एखादा मुद्दा असतो, तेव्हा त्यावर नैतिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित केले जातात. पण तेच जर एखाद्या पुरुषाने केलं तर त्यावर काहीच प्रश्न विचारले जात नाहीत,' असं तिने लिहिलं होतं. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य विवाहबंधनात अडकले होते. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये गोव्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या 'बिग फॅट वेडिंग'ची चर्चा संपूर्ण कलाविश्वात होती.