लालसिंह चढ्ढानंतर आमीर खानचा नवा चित्रपट; वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 26 June 2020

कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. सगळीकडची थिएटर्स बंद आहेत आणि त्यांचा पडदा कधी उघडेल हे सांगता येत नाही. सरकारने काही नियम दिले आहेत आणि त्याचे पालन करून हळूहळू चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. सगळीकडची थिएटर्स बंद आहेत आणि त्यांचा पडदा कधी उघडेल हे सांगता येत नाही. सरकारने काही नियम दिले आहेत आणि त्याचे पालन करून हळूहळू चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. चित्रीकरण जसे सुरू झाले तशा काही गुड न्यूजदेखील येऊ लागल्या आहेत. मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान सध्या लालसिंह चढ्ढा हा चित्रपट करीत आहे. खरे तर हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु थिएटर्स बंद असल्यामुळे प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षी करण्याचे ठरविेले आहे. 

सोमवारपर्यंत मृत्यूंची माहिती सादर करा; अन्यथा कठोर कारवाई... वाचा सविस्तर...

लालसिंह चढ्ढा या चित्रपटाचे काही चित्रीकरण बाकी आहे आणि ते आमीर खान पूर्ण करीलच, परंतु आमीर खानने आता विक्रम वेधाला आपल्या पुढील चित्रपटासाठी तारखा दिल्या आहेत. लालसिंह चढ्ढाचे शूटिंग झाले की आमीर खान या नव्या चित्रपटात बिझी असणार आहे. हा चित्रपट एका तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे आणि यामध्ये आमीर खान गँगस्टरची भूमिका साकारीत आहे. 

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली; तब्बल 'इतक्या' इमारती केल्यात सील...

आमीरबरोबरच सैफ अली खानदेखील या चित्रपटात आहे आणि तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. आमीर आणि सैफ तब्बल वीसेक वर्षांनी एकत्र येत आहेत. याअगोदर त्यांनी दिल चाहता है या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला चालला होता. अन्य कलाकार कोण असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आमीरने हा नवा चित्रपट स्वीकारला आहे हे नक्की.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amir khans new film coming soon after lalsingh chaddha, read full story