esakal | सोमवारपर्यंत मृत्यूंची माहिती सादर करा; अन्यथा कठोर कारवाई... वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

दिवसेंदिवस मुंबईत कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृतांचाही आकडाही वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंख्येवरून विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. मृतांच्या आकडेवारीवरुन भाजपने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला घेरले आहे.

सोमवारपर्यंत मृत्यूंची माहिती सादर करा; अन्यथा कठोर कारवाई... वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिवसेंदिवस मुंबईत कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृतांचाही आकडाही वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंख्येवरून विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. मृतांच्या आकडेवारीवरुन भाजपने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला घेरले आहे. त्यावर आता सर्व रुग्णालयांना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश आज आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. या मुदतीत माहिती न दिल्यास साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई केली जाणार आहे.

देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती 48 तासांत महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक आहे. मात्र,रुग्णालयांकडून ही माहिती विलंबाने येत आहे. तसेच यापूर्वी झालेल्या मृत्यूची माहिती न मिळाल्याची शक्यता आहे. याबाबत आता आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी (ता.29) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मृत्यूंबद्दल महापालिकेला माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

कोरोनाकाळातील कामगिरीचा परिणाम, नवी मुंबई आयुक्तांच्या बदलीचा निर्णय स्थगित

48 तासात माहिती सादर करण्याचे आदेश पालिकेने 8 जून रोजी दिले आहेत. मात्र, अद्याप पूर्ण माहिती मिळत नसल्याची शक्यता आहे. विधानभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मुंबईतील 800 हून अधिक कोरोना बाधित मृतांची नोंद नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पालिकेने ही नोंद केली. आता रुग्णालयाबाहेर झालेल्या कोरोनामुळे झालेल्या मृतांचाही मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. 

पर्यटकांना आता समुद्रकिनारी मिळणार चौपाटी कुटीचा आनंद; राज्यात 'या' किनाऱ्यावर मिळणार सुविधा...

तसेच एका दिवशी मृतांचा आकडा जास्त वाटू नये म्हणून थोडी थोडी माहिती जाहीर केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेनेही आता रुग्णालयांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत ही माहिती सादर न झाल्यास कारवाई सुरु केली जाणार आहे. 

loading image
go to top