अन् 'त्या' रात्री असे काय घडलं ज्यामुळे अमिताभपासून रेखा दूर झाल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी जीवन सुद्धा खूप चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. मात्र एका रात्रीनंतर रेखा अचानक अमिताभ यांच्या जीवनातून गायब झाल्या. 

मुंबई : बॉलिवूडचा अनभिशिक्त सम्राट म्हणजे अमिताभ बच्चन हाेय.  त्यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. अभिनयात त्यांचा हात काेणीच पकडू शकत नाही. अभिनयासाेबत अमिताभ यांचं खासगी जीवनसुद्धा खूप चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. मात्र एका रात्रीनंतर रेखा अचानक अमिताभ यांच्या जीवनातून गायब झाल्या. 

तो काळ होता 1977चा जेव्हा रेखा भागात सिंदूर भरून गर्भवती असल्याच्या चर्चा मीडियामध्ये पसरवून अमिताभ यांच्यसोबतच नातं जगजाहिर करण्याच्या तयारीत होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन मात्र शांतपणे तुटत चाललेला आपला संसार सावरायचा प्रयत्न करण्यात गुंतल्या होत्या.

अमिताभ आणि रेखा यांचं नात्याची चर्चा त्यावेळी जोरदार सुरू होती. मात्र जयांनी यावर कधीच कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांतपणे आपलं काम करत राहिल्या. एक दिवस जेव्हा अमिताभ कोणत्यातरी सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यादिवशी जया यांनी रेखांना फोन केला. रेखा यांना वाटलं की आता जया त्यांच्याशी भांडतील. त्यांना अनेक गोष्टी ऐकवतील. पण जया यांनी असं काहीही केलं नाही. जया यांनी रेखा यांना रात्री घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं. रेखांना वाटलं घरी गेल्यावर जया त्यांचा अपमान करतील किंवा मारामारी होईल.

रात्री जेव्हा रेखा नटून-थटून जया यांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी जया अत्यंत साध्या कपड्यांमध्ये होत्या. त्यांनी रेखा यांचं स्वागत केलं. गप्पा मारल्या. दोघींनी एकत्र जेवण केलं. जयांनी रेखा यांना संपूर्ण घर, गार्डन दाखवलं त्यांना आदर सत्कार केला.  डिनर नंतर जेव्हा रेखा परत निघाल्या त्यावेळी त्यांना निरोप देताना जया यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली ज्यामुळे रेखा यांच्या पायाखालची जमिन सरकली. जया म्हणाल्या, 'काहीही झालं तरी मी अमितला कधीच सोडणार नाही.'

दुसऱ्या दिवशी या डिनरच्या प्रचंड चर्चा झाल्या, उलट-सुलट बातम्या छापल्या गेल्या. मात्र याविषयी ना जया कधी काही बोलल्या ना रेखा यांनी कधी तोंड उघडलं. पण त्या एका रात्रीनंतर अमिताभ यांच आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. रेखा यांनी अमिताभ यांच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan birthday special story of amitabh bachcha rekha and jaya bachchan