Amitabh Bachchan : महानायकानं दोनवेळा दिली मृत्युला हुल! यापूर्वीही अनेकदा...

आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्रोजेक्ट के च्या शुटींगच्या वेळी अमिताभ यांना दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan esakal

Amitabh Bachchan Injured On This Sets : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या प्रोजेक्ट के चित्रपटाच्या वेळी गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या अपघाताची बातमी कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बी यांना अशाप्रकारे पहिल्यांदाच अपघात झाला असे नाही यापूर्वी देखील त्यांना जीवघेण्या अपघातांना सामोरं जावं लागलं आहे.

७० च्या दशकांध्ये देखील महानायक अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्रोजेक्ट के च्या शुटींगच्या वेळी अमिताभ यांना दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

असं म्हटलं जातं अमिताभ यांनी जेव्हा जेव्हा के प्रोजेक्टनं शुटिंगला सुरुवात केली तेव्हा त्यांना कोणत्या ना कोणत्या अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. अर्थात याला त्यांचे काही चित्रपट अपवाद आहेत. पहिल्यांदा अमिताभ यांना कुली या ८० च्या दशकातील चित्रपटाच्यावेळी जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी तर अमिताभ यांची प्रकृती भलतीच गंभीर झाली होती.

एकलव्य - द रॉयल गार्ड

केवळ कुली नाही तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या एकलव्य द रॉयल गार्डच्या सेटवर देखील जखमी झाले होते. त्यावेळचा आपला अनुभव शेयर करताना ते म्हणाले, मला शुटींगच्या दरम्यान उंटांच्या कळपामध्ये उडी घ्यायची होती. आणि तिथुन बाहेर पडायचे होते. माझ्याभोवती तीस ते चाळीस उंट होते. त्यातल्या एका उंटानं त्यांच्या डोक्याला लाथ मारली होती.

Amitabh Bachchan
Ajay Devgn: 'ती खोटारडी आहे,' असं म्हणत सर्वांसमोर अजय देवगणनं रवीना टंडनचा केला होता अपमान

कौन बनेगा करोडपती -

अमिताभ बच्चन हे त्यांच्या प्रसिद्ध अशा कौन बनेगा करोडपती १४ च्या पर्वात सेटवर जखमी झाले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी बिग बी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या पायाची नस कापली गेली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पायावर शस्त्रक्रिया केली होती. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही गोष्ट सांगितली होती.

Amitabh Bachchan
हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान Amitabh Bachchan यांना गंभीर दुखापत, तत्काळ मुंबईत रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com