अमिताभ बच्चन यांच्या पुजाऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

विंध्यवासिनी देवीच्या मंदिराबाहेरील हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
amitabh bachchan,vindhyachal  temple
amitabh bachchan,vindhyachal temple file image

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या पुजारींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे असलेल्या विंध्यवासिनी देवीच्या मंदिरा बाहेरील हा व्हिडीओ आहे. मंदिराबाहेर पोलिस आणि अमिताभ बच्चन यांच्या पुजारीमध्ये वाद झाला. नंतर पोलिसांनी पुजाऱ्यांना मारण्यास सुरुवात केली. वीकेंड लॉकडाउनदरम्यान मंदिरातील दर्शनावरून पोलिस आणि पुजाऱ्यंमध्ये हा वाद झाला. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (amitabh bachchan family priest beaten by police at vindhyachal temple video viral on social media)

रविवारी लॉकडाऊन असल्याने विंध्यवासिनी देवीचे मंदिर दर्शासाठी बंद असते. परंतु चंदौलीचे जिल्हा न्यायमूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाला देवीचे दर्शन घ्यायचे होते. त्यामुळे पोलिसांनी मंदिर उघडले. मंदिर उघडल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या पुजाऱ्यांनीदेखील त्यांच्याकडे आलेल्या यजमान भाविकांना घेऊन दर्शासाठी देवळात आले. त्यावेळी पोलिसांनी पुजारी आणि त्यांच्यासोबत आलेल्यांना अडवले. दर्शनावरुन झालेल्या वादात पोलिसांनी पुजाऱ्यांना मारलं.

amitabh bachchan,vindhyachal  temple
'The Family Man 2'चा नवा विक्रम; 'फ्रेंड्स', 'गेम ऑफ थ्रोन्स'लाही टाकलं मागे

पुजारी अमित पाण्डेय हे अमिताभ बच्चन यांच्यासह सोनिया गांधी यांच्या परिवाराचेही पुजारी आहेत. जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिकारी संजय वर्मा यांनी सांगितले की, चंदौलीचे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही देवीचे दर्शन घेऊ दिले नाही. परंतु तेव्हा अमित पाण्डेय त्यांच्या यजमान भाविकांना घेऊन देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावरून पोलिस आणि पाण्डेय यांच्यात वाद झाला. उत्तर प्रदेश सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गंत शनिवारी आणि रविवारी विंध्यवासिनी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतर दिवशीही सर्वसामान्य लोकांसाठीही देखील दर्शन घेण्यास मनाई आहे. मंदिरातील पुजा-यांनाच केवळ आत प्रवेश करण्यास परवानगी आहे.

amitabh bachchan,vindhyachal  temple
बिग बॉस मराठी ३ लवकरच; महेश मांजरेकरांनी शेअर केला व्हिडीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com