अमिताभ बच्चन यांच्यावर मित्राने केला दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, बिग बींनी दिलं मजेशीर उत्तर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 5 October 2020

लॉकडाऊनमध्ये मोठा ब्रेक झाल्यानंतर बिग बी आता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. या वयातही अमिताभ १२ ते १५ तास काम करतात.

मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असणा-या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती ते सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. लॉकडाऊनमध्ये मोठा ब्रेक झाल्यानंतर ते आता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. या वयातही अमिताभ १२ ते १५ तास काम करतात. या दरम्यान त्यांच्यासोबत असं काही झालं ज्याची माहिती त्यांना चाहत्यांसोबत शेअर करण्यावाचून राहावलं नाही.

हे ही वाचा: 'बेल बॉटम'चा टिझर रिलीज, ८० च्या दशकातील अक्षय कुमारचा जबरदस्त लूक

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मित्रासोबतचा घडलेला त्यांचा किस्सा शेअर केला. बिग बी कामात इतके बिझी असतात की एका दिवशी त्यांच्या मित्राने ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार केली. ज्याचं अमिताभ यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं. अमिताभ यांनी लिहिलं, 'त्यांनी मला सांगितलं, अमित जी तुम्ही मला दुर्लक्षित करत आहात. मित्र आहे माझा. विचार केला की त्याला उत्तर देऊ. तर मी म्हटलं, भावा १२ ते १५ तास केल्यानंतर केवळ घोरण्यासाठी विळ मिळतो दुर्लक्षित करण्यासाठी नाही.'

अमिताभ सध्या छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती १२'चं शूटींग करत आहेत. या शोसोबत बिग बींची खास जवळीक आहे. जेव्हा त्यांचं करिअर काही वेळासाठी डगमगलं होतं तेव्हा त्यांना याच शोने पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणलं होतं. बिग बी नेहमीच चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या मित्रासाठी त्यांनी लिहिलेलं हे उत्तर देखील चाहत्यांना त्यांचं कामाप्रती असलेलं प्रेम दाखवत आहेत.   

amitabh bachchan friend says you are ingnoring me  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan friend says you are ingnoring me