Amitabh Bachchan Birthday: खूप कमी वयात अमिताभना घडलेली चांगलीच अद्दल, म्हणूनच सिगारेट,दारुपासून लांब राहतात शहनशाह..

अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. त्यांनी यादरम्यान ब्लॉग लिहून आपल्या आयुष्यातील एक सीक्रेट शेअर केलं आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanInstagram

Amitabh Bachchan : आज अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस. अमिताभ यांनी गेली अनेक वर्ष बॉलिवूडवर निर्विवादपणे राज्य केलंय.

काही दिवसांपुर्वी 'प्रोजेक्ट के' सिनेमाच्या सेटवर दुखापत झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यादरम्यान त्यांनी एक ब्लॉग लिहून चाहत्यांसोबत तो शेअर केला आहे. (Amitabh Bachchan got big lesson at young age now he does not touch alcohol and cigarettes)

Amitabh Bachchan
Pratyusha Banerjee: 'प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती,त्यादिवशी..', 8 वर्षांनी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा
Amitabh Bachchan
Viral Video: मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा पब्लिकनं घेरल्यावर भडकली.. मागचा-पुढचा विचार न करता धमकी देत म्हणाली..

अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉ़गमध्ये धुम्रपान आणि मद्यपान सोडण्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ''पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान त्यांच्यासोबत शिकणारे त्यांचे मित्र दारु पिण्यासाठी सायन्स लॅबमध्ये जमा झाले होते. ज्यानंतर ते खूप आजारी पडले होते. आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभनी लिहिलं आहे की त्यावेळी झालेल्या एका गंभीर शारिरीक अवस्थेमुळे आयुष्यात खूप मोठी शिकवण मला मिळाली होती''.

आपल्या आयुष्याशी जोडलेल्या काही खास गोष्टींना आठवत अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''दारु आणि सिगारेट सोडणं हा निर्णय सर्वस्वी माझा होता''.

बिग बी यांनी धुम्रपान हे व्यसन एकाच प्रयत्नात कसं सोडवलं जाऊ शकतं याविषयी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. खरंतर याआधी देखील अमिताभनी दारु आणि सिगारेटच्या व्यसनांपासून आपण दूर राहतो हे सांगितलं होतं. सिगारेट ओढणाऱ्यांना अमिताभ म्हणाले की या लोकांनी सिंगारेट आपल्या ओठांवर क्रश करा,हा सिगारेट सोडण्यावर चांगला उपाय आहे.

Amitabh Bachchan
Shruti Haasan:'मायनस डिग्री टेम्प्रेचरमध्ये पातळ साडीवर अभिनेत्रींना नाचवता आणि ..', श्रुतीनं दिग्दर्शकांना सुनावलं

माहितीसाठी इथं सांगतो की,अमिताभ बच्चननं याआधी देखील सिगारेटच्या व्यसनावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी याआधी देखील सिगारेटच्या व्यसनासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. बिग बी बरे झाल्यानंतर लगेच सिनेमाचं शूट सुरू करणार आहेत. आपल्याला दुखापत झाल्यानंतर अमिताभ बच्चननी चाहत्यांना भेटणं बंद केलं आहे. तसं पाहिलं तर बिग बी प्रत्येक रविवारी आपल्या चाहत्यांसाठी 'जलसा'च्या बाहेर येतात. 'प्रोजेक्ट के' व्यतिरिक्त अमिताभ बच्चनजवळ अजूनही बरेच प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com