Shruti Haasan:'मायनस डिग्री टेम्प्रेचरमध्ये पातळ साडीवर अभिनेत्रींना नाचवता आणि ..', श्रुतीनं दिग्दर्शकांना सुनावलं

श्रृती हासनची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Shruti Haasan Viral Video
Shruti Haasan Viral VideoEsakal

Shruti Haasan Viral Video: स्वित्झरलॅंड किंवा काश्मिरमधील बर्फाच्या डोंगररागांचा सुंदर नजारा सिनेमातील एखाद्या गाण्यात असला की यामध्ये एक सीन दाखवला जातो जो जवळपास सगळ्याच हिंदी सिनेमांचा प्राण समजला जातो.ज्यामध्ये शिफॉन साडीत ग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिसते. हा सीनही असतो किंवा अनेकदा डान्सही असतो.

आणखी एक गोष्ट यात कॉमन दिसेल,ती म्हणजे अभिनेत्री एक पातळशी साडी फक्त नेसलेली असते तर अभिनेत्याच्या अंगावर ब्लेजर,पॅंट आणि शर्ट असतो. यावरनं हा अंदाज लावला जाऊ शकतो की अभिनेत्रीला त्या बर्फाळ डोंगररांगात मायनस टेम्प्रेचरमध्ये नाचायचं असतं सगळं काही सहन करत तर अभिनेत्याला मात्र याचं काही टेन्शन नसतं.आता अशाच सीनविषयी श्रृती हासननं दिग्दर्शकांना आपल्या अंदाजात सुनावलं आहे.(Shruti Haasan Special requests filmmakers to avoid making actresses dance in snow)

Shruti Haasan Viral Video
Viral Video: मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा पब्लिकनं घेरल्यावर भडकली.. मागचा-पुढचा विचार न करता धमकी देत म्हणाली..

श्रृती हासनची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुलाखतीत श्रृती सगळ्याच दिग्दर्शकांकडे आणि निर्मात्यांकडे एक मागणी करताना दिसत आहे. श्रृती हासनच्या या मुलाखतीची सुरुवात दक्षिण भारतीय भाषा बोलत होते,मग मध्येच ती इंग्रजी भाषेत बोलते.

या मुलाखतीत श्रृती हासन बोलताना दिसते की तिला बर्फाळ डोंगररांगांमध्ये डान्स करणं मुळीच पसंत नाही. अभिनेता जॅकेट घालून चालतो पण अभिनेत्रीला मात्र शाल,जॅकेट किंवा कोट देखील घालता येत नाही. त्यांना फक्त साडी आणि ब्लाऊज एवढंच घालून परफॉर्म करायचं असतं. तेव्हा याचा विचार फिल्ममेकर्सनी करायलाच हवा.

हे खरंतर खूप कठीण आहे. या मुलाखतीच्या क्लीपनंतर चिरंजीवी आणि श्रृती हासन यांच्या गाण्याची एक क्लिप देखील आहे, ज्यामध्ये बर्फानं वेढलेल्या वातावरणात ते डान्स करताना दिसत आहेत.

Shruti Haasan Viral Video
Pratyusha Banerjee: 'प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती,त्यादिवशी..', 8 वर्षांनी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा

श्रृती हासनसाठी या वर्षाची सुरुवात जबरदस्त राहिली. तिचे दोन शानदार सिनेमे रिलीज झाले. 'वीरा सिम्हा रेड्डी' आणि 'वालतेयर वीरैया' अशी त्या दोन सिनेमांची नावे आहेत. आता लवकरच बाहुबली फेम प्रभास सोबत 'सालार' सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती आपली इंग्लिश वेबसिरीज 'द आई' विषयी खूपच उत्सुक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com