या सुपरस्टार अभिनेत्याने मजुरांना मदत करुन विमानाने पाठवलं घरी

amitabh  bachchan helping up migrants arrange six charted fights reach them home corona lockdown
amitabh bachchan helping up migrants arrange six charted fights reach them home corona lockdown

मुंबई : लाॅकडाउनमुळे हातावरील पोट असणाऱ्या गोरगरीब मजुरांचे खूप हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे सरसावले आहेत. त्यात अभिनेता सोनू सूदनंतर आता सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन हे देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

मुंबईत अडकलेल्या ७०० मजुरांना अमिताभ बच्चन यांनी चार विशेष विमानाने त्यांच्या घरी उत्तर प्रदेशमध्ये पाठवलं आहे. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून अडकलेल्या मजुरांसाठी ट्रेनची व्यवस्था करायची होती, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव हे बच्चन यांच्या निर्देशानुसार विमानांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

तसेच बुधवारी सकाळी मुंबईहून चार विमान हे गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी उड्डाण घेतले आहे. प्रत्येक विमानात प्रवास करताना १८० प्रवासी होते. यापूर्वी गेल्या आठवड्यात बच्चन यांनी १५०० मजुरांना बसेसची व्यवस्था करुन घरी पाठवले होते. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जवळपास १५०० मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. मजुरांना आपल्याला घरी पोहच करण्यासाठी अनेक सुपरस्टार मदत करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com