Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाला पडले टाके ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाला पडले टाके ...

अभिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडती’  चा 14 वा सीझन सुरू झाल्यापासून चर्चेत आहे.  अनेक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. त्याच्या दमदार आवाजाने शो दणाणून सोडणाऱ्या बिग बी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. एका एपिसोडच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली असून त्या पायाला टाके पडले आहेत.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर?

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा  'कौन बनेगा करोडपती 14' या क्विझ शोच्या  सेटवर हा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाची नस कापली गेली आहे. याची माहिती स्वत: बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, सेटवर त्यांचा पाय कापल्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये माहिती देत त्यांनी सांगितले की, ही दुखापत कशी झाली? अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, धातूच्या धारदार वस्तूने त्यांच्या डाव्या पायाचा मागील भाग कापला, त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामूळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्याच्या पायाला टाके पडले.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: मोठ्या आशेनं किरण मानेंकडे गेली तेजस्विनी,पण मानेंनी घातली अट, म्हणाले...

आता चिंता करण्याचे कारण नाही. ते पूर्णपणे बरे आहेत.अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता बरी असली तरी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना पायावर भर देण्यास किंवा चालण्यास मनाई केली आहे. बिग बींनी नुकताच त्यांचा 80वां वाढदिवस साजरा केला.या अपघातामूळे त्यांचे फॅन्स घाबरले आहेत.त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.