कुलीच्या प्रामाणिकपणाला सलाम! अमिताभ यांच्या मेकअप मॅनचा मोबाईल केला परत| Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan Makeup Artis

Viral News : कुलीच्या प्रामाणिकपणाला सलाम! अमिताभ यांच्या मेकअप मॅनचा मोबाईल केला परत

Amitabh Bachchan Makeup Artist : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मेकअप मॅनशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचे शहेशनहा अमिताभ बच्चन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहे. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील बिग बी यांच्यातील उत्साह हा जराही कमी झालेला नाही. सध्या ते त्यांच्या मेक अप मॅनची चर्चा आहे.

अमिताभ बच्चन यांच्या मेक अप मॅनचा दीड लाखाचा मोबाईल रेल्वे स्टेशनवर हरवला. त्यानंतर त्यानं तातडीनं स्टेशनवरील पोलिसांशी संपर्क साधला. मात्र एका ६२ वर्षांच्या कुलीनं तो मोबाईल त्या व्यक्तीला परत केल्याचे दिसून आले. त्याच्या प्रामाणिकपणाचे आता सोशल मीडियावरुन कौतूक होतान दिसून आले आहे. रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दिल्या जातात. मात्र तो मोबाईल पुन्हा मिळतोच असे नाही.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

रेल्वे स्टेशनवर ज्यांचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला अशा व्यक्ती पुन्हा त्यांचा मोबाईल मिळेल याची अपेक्षा सोडून देतात. मात्र सध्या अमिताभ बच्चन यांच्या मेक अप दीपक सावंतचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्यानं तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी दादर रेल्वे स्टेशनवर नाईट ड्युटी करणाऱ्या कुलीनं त्यांचा मोबाईल परत केल्याचे दिसून आले. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होताना दिसत आहे.

त्या कुलीच्या मनात आले असते तर त्यानं तो मोबाईल विकून पैसे कमावलेही असते. मात्र तसे न करता त्यानं त्याच्या प्रामाणिपणा आणि माणूसकीची आगळी वेगळी शिकवण दिली आहे. सोशल मीडियावर त्या कुलीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे. त्या कुलीचे वय ६२ वर्षे असून त्यांचे नाव हमला असे आहे.