अमिताभ बच्चन यांचा नागराजच्या सिनेमाला बाय-बाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

आपल्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात अमिताभ बच्चन यांनी काम करावे यासाठी नागराज यांनी त्यांना राजी केले.

पुणे - 'झुंड' या सिनेमातून अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड मधील पहिला सिनेमा आहे. सिनेमाच्या तारखा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली. 

नागराज मंजुळे आणि सिनेमाचे निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही अमिताभ यांनी परत केले आहेत. सैराट सिनेमाच्या तुफान यशानंतर नागराज आता थेट बॉलिवूडमधून एन्ट्री करणार आहेत. आपल्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात अमिताभ बच्चन यांनी काम करावे यासाठी नागराज यांनी त्यांना राजी केले. मात्र 'झुंड' या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ परीसरात करण्याचे ठरले होते. तसा सिनेमाचा सेटही तिथे लावण्यात आला होता. पण  विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसिल कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला. त्यातच काही संघटनांनीही येथील चित्रीकरणास विरोध केला होता. म्हणून सिनेमाचा सेट विद्यापीठाच्या मैदानातून हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला होता.

'झुंड' हा सिनेमा फुटबॉलशी संबंधित आहे. सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका होती. त्यांच्या भूमिकेच्या चित्रीकरणासाठी नागराज यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागावर सेट उभारला होता. खेळावर आधरित सिनेमा असल्याने विद्यापीठाकडूनही सिनेमाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan Quit Nagraj Manjules Upcoming Bollywood Film Jhund