esakal | अमिताभ यांच्या कोरोना आणि कुली अपघाताशी संबधित 'हा' आहे मोठा योगायोग...
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan

'कुली' सिनेमाच्या शूटींग दरम्यान अमिताभ गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळीही त्यांच्यासाठी देशभरातून अनेकजण प्रार्थना करत होते.  बिग बी त्यातूनंही सुखरुप घरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळच्या त्या घटनेशी आणि आत्ताच्या कोरोनाच्या घटनेशी एक कमालीचा योगायोग आहे.

अमिताभ यांच्या कोरोना आणि कुली अपघाताशी संबधित 'हा' आहे मोठा योगायोग...

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अमिताभ बच्चन याना जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. नुकतेच ते यातुन बरे होऊन घरी परतले आहेत. बिग बींना कोरोना झाला हे ऐकून संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. अशीच एक घटना त्यांच्यासोबत याआधी देखील घडली आहे. 'कुली' सिनेमाच्या शूटींग दरम्यान अमिताभ गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळीही त्यांच्यासाठी देशभरातून अनेकजण प्रार्थना करत होते आणि बिग बी त्यातूनंही सुखरुप घरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळच्या त्या घटनेशी आणि आत्ताच्या कोरोनाच्या घटनेशी एक कमालीचा योगायोग आहे.

जेनेलिया बर्थडे स्पेशल: मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून रितेशला टाळत होती जेनेलिया, मग अशी सुरु झाली लव्हस्टोरी

'कुली' सिनेमाच्या शूटींगवेळी अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर यांच्यामध्ये फाईट सीन होता. २६ जुलै १९८२ मध्ये कुली सिनेमाची शूटींग बँगलोरमध्ये होत होती. पुनीस इस्सरसोबत फाईट सीनमध्ये एक शॉट चूकला आणि अमिताभ यांच्या पोटात लोखंडाच्या टेबलचा कोपरा लागला ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता कारण तेव्हा त्यांची हालत खूपंच गंभीर होती.

डॉक्टरांनी तेव्हा बिग बींना २ ऑगस्ट रोजी धोक्यातून बाहेर आल्याचं सांगितलं होतं. आणि आताही योगायोग असा की २ ऑगस्ट रोजीच अमिताभ यांची कोरोनातून मुक्तता झाल्याची बातमी कळाली. अमिताभ यांनी सोशल मिडियावर पोस्ट करुन सांगितलं होतं की २ ऑगस्ट हा दिवस त्यांचा दुसरा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळीही संपूर्ण देशाला ही आनंदाची बातमी २ ऑगस्टलाच मिळाली. 

अभिषेक बच्चन याने २ ऑगस्टलाच बिग बी यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येऊन त्यांना डिस्चार्ज मिळाल्याचं ट्वीटरवर सांगितलं होतं. अभिषेक अजुनही हॉस्पिटलमध्येच आहे. ऐश्वर्या, आराध्या आणि अमिताभ कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. अभिषेक लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.  

amitabh bachchan recovered from coolie accident and corona on same date 2 august  

loading image