मिल्खा सिंग यांच्या आत्मचरित्राचे शेवटचे पान; बिग बींची ट्विटरवर पोस्ट

'दाना खाक मे मिल कर गुल-ए-गुलजार होता है..'
big b milkha singh
big b milkha singh

अॅथलेटिक्समध्ये देशाचा तिरंगा सातासमुद्रापार फडकवणारे भारताचे धावपटू मिल्खा सिंग Milkha Singh यांचे शुक्रवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. 'फ्लाइंग सिख' म्हणून ओळखले जाणारे मिल्खा यांची कोरोनाशी महिनाभरापासूनची झुंज अखेर शुक्रवारी थांबली. मिल्खा यांच्या निधनावर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येतोय. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी मिल्खा सिंग यांच्या आत्मचरित्रातील शेवटचं पान सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'द रेस ऑफ माय लाइफ' असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. 'मिल्खा सिंग यांच्या पुस्तकातील शेवटचं पान.. सर्वांसाठी प्रेरणादायी', असं कॅप्शन देत बिग बींनी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला. (Amitabh Bachchan remembers Milkha Singh says An inspiration for all)

काय लिहिलं आहे शेवटच्या पानावर?

'माझे अखेरचे शब्द असतील: एक खेडाळू म्हणून आयुष्य कठीण असतं आणि असे अनेक क्षण समोर येतात ज्यावेळी तुम्हाला सोडून द्यावंसं वाटेल किंवा शॉर्टकट घ्यावंसं वाटेल. पण लक्षात ठेवा यशाच्या मार्गात कोणताच शॉर्टकट नसतो. अशा वेळी तुम्ही या उर्दू दोहांमधून प्रेरणा घ्या- 'मिटा दे अपनी हस्ती को अगर कोई मरहबा चाहे, की दाना खाक मे मिल कर गुल-ए-गुलजार होता है'. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं अस्तित्व पुसून टाका. कारण बियाला फुलामध्ये बहरायचं असेल तर धुळीशी एकरूप व्हावं लागतं', असं त्यांच्या आत्मचरित्रातील शेवटच्या पानावर लिहिलं आहे.

big b milkha singh
मिल्खा सिंग यांच्या निधनाने हळहळलं बॉलिवूड

मिल्खा सिंग ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या सहा दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि भारतीय व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांनीही कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला होता.

big b milkha singh
तेजश्री प्रधानसोबत मालिका ते लग्नापर्यंतच्या गप्पा, पाहा अनकट मुलाखत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com