esakal | पांडुरंगाच्या चरणी अमिताभ बच्चन नतमस्तक; केलं खास ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan

पांडुरंगाच्या चरणी अमिताभ बच्चन नतमस्तक; केलं खास ट्विट

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी खास दिवस. या दिवशी राज्यातील अनेक वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरात दाखल होतात. आजच्या दिवसानिमित्त कित्येक जणांनी सोशल मिडीयावरुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. नुकतेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी देखील एक खास ट्विट करून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (amitabh bachchan share photo of Vitthal and Rakhumai on occasion of ashadhi ekadashi pvk99)

अमिताभ बच्चन हे दरवर्षी आषाढी एकादशीला सोशल मीडियावर खास पोस्ट करून सर्व भाविकांना शुभेच्छा देतात. नुकताच त्यांनी विठ्ठल आणि रखुमाईचा सुंदर फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'ओम नमो भगवते वासुदेवाय,आषाढ मास, शुद्ध एकादशी , मंगळवार , दि 20जुलै २०२१, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर', त्यांच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने अमिताभ यांच्या ट्विटला कमेंट केली, 'आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना शुभेच्छा !'

हेही वाचा: विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

काही दिवसांपुर्वी अमिताभ यांनी विठ्ठल रूक्मिणीचा एक सुंदर फोटो पोस्ट करून कोरोना माहामारीमुळे देशात आलेले संकट दूर व्हावे आणि देशात पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती. त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले, ‘प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विठ्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर’

हेही वाचा: Ashadhi Ekadashi: विरारच्या कौशिकने साकारला अनोखा पांडुरंग

loading image